Bluepad | Bluepad
Bluepad
🏹 'राम' - रहस्य 🏹
उपेंद्र सावंत
उपेंद्र सावंत
3rd Aug, 2022

Share

रामायणातील व्यक्तिरेखांचा प्रतिकात्मक अर्थ जाणून घेऊन त्यांचा आपल्या मानवी जीवनाशी संबंध प्रस्थापित करता येईल! रामायणातील व्यक्तिरेखांचा प्रतीकात्मक अर्थ (symbolic meaning) अभ्यासल्यास.... आपल्या अंतरंगातील सूक्ष्म घडामोडींचा आढावा घेणं सोपं होऊ शकेल! या पृथ्वीतलावावरील प्रत्येक व्यक्ती ही साधकच असते.साधक साध्य प्राप्त करण्याकरिता साधना करत असतो. मानवी जीवन ही एक साधनाच आहे. मानवी अंतरंगात अनेक रहस्य दडलेली आहे. रामायणाचा मूळ गर्भित अर्थ जाणून घेऊन... तो वास्तव जीवनात कसा उतरवता येईल... याचा आपण विचार केला पाहिजे! रामायणातील व्यक्तिरेखा, विविध प्रसंग, नीती मूल्य याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने त्याचा वैयक्तिक दृष्ट्या अभ्यास करणे गरजेचे आहे.
✴️🔆 राम🔆✴️:-1) राम म्हणजे आपल्या शरीरातील " आत्मा "होय. त्याकरिता ' आत्माराम ' हा शब्दप्रयोग देखील केला जातो.
2) " रां "( राम ) हे अग्नी 🔥 बीज आहे. "रं "(ram) हा मणिपूर चक्राचा ( solar plexus ) बीज मंत्र होय. मणिपूर चक्र हे इच्छा, आकांक्षा, महत्वकांक्षांचं केंद्र आहे. मणिपूर चक्राला " आंतरिक सूर्य ( inner sun🌄) असं म्हटलं जातं. रवी /सूर्य हा -शरीरातील आत्मा ( soul)याचं प्रतिनिधित्व करतो. मणिपूर चक्रातील इच्छा ना योग्य दिशेने प्रवाहित केल्यास.... रामतत्त्वाच्या दिशेने साधकाचा प्रवास सुरू होतो. राम तत्वाचा अभ्यास म्हणजे " आत्मबळ "," आत्मशक्ती " प्राप्त करण्याची उपासना होय.
याउलट मणिपूर चक्रातील इच्छा... अयोग्य दिशेने वळवल्यास मानवाचा "रावण प्रवृत्तीच्या" दिशेने प्रवास सुरू होत असतो.रावणाच्या राक्षसी महत्वकांक्षेने त्याला कुठे नेऊन ठेवलं? हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
3) राम हा आपल्या शरीरातील✴️ " आत्मा"✴️..... त्याचबरोबर...🔆 " सूर्य तत्व "🔆... याचं प्रतिनिधित्व करतो.
4) अनेक जन्मांच्या चांगल्या वाईट संस्काराने आपल्या चित्तावर काही नकारात्मक कर्माची "काजळी "धरते. ज्याप्रमाणे एखाद्या कंदीलावर काजळी धरते, अगदी तसंच! कंदीलाची काच ' आतून ' पुसल्यावर ' बाहेर' सभोवताली त्याचा लखलखीत प्रकाश पडतो. त्याचप्रमाणे... 'राम '🔥 रुपी अग्नी बीजाच्या प्रकाशामुळे 💥 आपल्या अंतरंगातील पूर्वकर्मांचे काजळी दृश्यमान होते. योग्य अभ्यासाने ' चुकीचे संस्कार दुरुस्त करून ' अंतरंगात बदल घडवून आणणे, हे आपले कर्तव्य आहे." राम " रुपी 'नाम ' सर्व प्रकारची पाप जाळून ♨️ टाकेल ह्या भ्रमात साधकाने राहू नये. आपल्या विचार व आचरणात बदल करणे आवश्यक आहे.
5) मानवी अंतरंगातील " जीवात्मा " हा शिव रूपाशी तद्रूप होऊ पाहतो. त्यावेळेला राम -जीवनातील नीती मूल्यांचा उपयोग आपल्याला नक्कीच होऊ शकतो. सध्याच्या कलियुगात हे थोडं अवघड आहे, परंतु अशक्य नाही.
6) राम रुपी दैवी अग्नीच्या प्रकाशात आपल्या अंतरंगातील पाप-पुण्याचा भाग दृश्यमान होऊ शकतो.
7)" सीता" रुपी मनाचं ( mind).... लक्ष्य (aim🎯)....'राम "🏹 हेच आहे.
8) सेतू ओलांडताना हनुमंत शिळेवर "राम " लिहिल्याने ते तरंगतात.... यामध्ये समुद्र म्हणजे " स्वाधिष्ठान "चक्र होय. स्वाधिष्ठान चक्र हे " भौतिक सुख संवेदना" ( sensuous materialistic pleasure ) यांचं केंद्र होय. यांचा अतिरेक झाल्यास मानव त्यात वाहून जाऊ शकतो. याकरिता " स्वाधिष्ठान " रुपी सुख-लालसांच्या समुद्रातून तारून जाण्याकरिता.... राम रुपी शुद्ध चैतन्याची जाणीव ठेवणं, प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. स्वाधिष्ठान चक्र हे नाभीच्या खाली तीन बोटं... या ठिकाणी अस्तित्वात असतं. मूत्र( urine )व मूत्रपिंड ( kidney ) ह्याचा संबंध या चक्राशी येत असल्याने " खारा समुद्र" असं देखील त्याला संबोधलं जातं
9) 'रामायण ' हा मानवाचा शुद्ध चैतन्याकडे म्हणजे आत्मतत्त्वाकडे जायचा एक प्रवास आहे. रामायण रुपी महाकाव्यातून वाल्मीकी ऋषींच्या लेखणीतून जीवाचा आत्माराम पर्यंतचा प्रवास सांकेतिक व गुढ पद्धतीने वर्णिलेला आहे.
10) मानवाच्या अंतरंगातील' राम 'ओळखणे..... हेच रामायणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. रामायण हा एक साधकाचा खडतर प्रवास दर्शवितो. जो 'सीता ' रुपी मनाकडून ➡️➡️➡️ राम रुपी आत्माराम पर्यंतचा प्रवास आहे. मन: चेतनेकडून >>> ब्रह्मचैतनेकडे घेऊन जाणारा हा प्रवास होय.
11) राम हे आत्मरूप ब्रह्म आहे. सीता ही' मन' रुपी माया आहे.
12) आत्मा व साधक यामध्ये 'राम नाम' हे सेतूप्रमाणे ( bridge ) कार्य करते.
13) जीवाला 'आत्मारामा'ची ओळख होण्याकरिता 'राम 'नामाचा ध्यास साधकासाठी उपयुक्त ठरतो.
14) अग्नि हा उर्ध्वगतीमय🔥 आहे. राम हा अग्नी -बीज♨️ कारक आहे. मानवाच्या शरीरात मणिपूर चक्रस्थानी अग्नी विराजमान असतो. याच करिता मणिपूर चक्राचे बीज मंत्र" रं "आहे. परंतु, मानवात क्रोधाग्नी ( anger ), कामाग्नी ( lust ) व जठराग्नी ( hunger )अस्तित्वात असतात. साधनेने अग्नी प्रदीप्त होऊन त्रास होऊ नये,म्हणून रामाच्या पुढे "श्री "बीज लावण्याची पद्धत आहे. त्रयोदशाक्षरी मंत्रातही 'श्री' चा वापर केला गेला आहे.
15) राम हा एक मंत्र आहे. रामायण हे एक तंत्र आहे. अंतरंगातील रहस्य जाणून घेण्याकरिता रामायणाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येक जण एक साधक असून.... राम हे साधन व साध्य दोन्ही आहे..!
( पुढे " सीता - रहस्य ' ह्या लेखात अधिक विवेचन पाहू.)🙏🙏🙏🌹🌹🌹
🏹 'राम' - रहस्य 🏹

538 

Share


उपेंद्र सावंत
Written by
उपेंद्र सावंत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad