Bluepad | Bluepad
Bluepad
नेटकरी
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
3rd Aug, 2022

Share

....नेटकरी.....
काय अवस्था ही नेटकऱ्यांची
मक्का माळ्याचा भांडणं कोल्ह्यांची..धृ
मी शहाणा माझंच खरं
चूक तुझी येड्या गबाळ्याची...१
नेतं घालती गळ्यात गळं
कार्यकर्ती मात्र भांडती उगी...२
देत नाही पोटाला कुणी
उगीच उठते खुमखुमी मधी...३
लक्ष द्या आपल्या परीवारावरी
राजकारण असे लष्करी भाकरी..४
राजकारणी आपला वापर करी
निवडणूकीपुरताच येतो दारी...५
काढू नका एकमेकांची उणी
देशाचा विचार असावा मनी...६
.... कवि अटलविलास....

246 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad