मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आजकालचे सो कॉल्ड ' ड्युड ' सोशल मीडिया वर आपले प्रश्र्न टाकतात आणि उत्तर (पर्याय) मागतात. आज एक गमितिशिर प्रश्न वाचला.... तुम्हाला त्याच्या भाषेत अनुवाद करण्याचा प्रयत्न करते.
प्रश्न - मी law (कायद्याचा) चां स्टूडेंट आहे, माझा प्रॉब्लेम आहे की मी ४४ वर्षाच्या एका मेकअप करणाऱ्या आर्टिस्ट ( कदाचित् beautician) तिच्या प्रेमात पडलोय आणि माझे वय आहे ३० वर्ष. काल तिने एक अतिशय vulger ( असभ्य किँवा अश्लील) ड्रेस घालून फोटोशूट केलं. आता ती जर का माझी गर्लफ्रेंड आहे तर तिला एवढा शॉर्ट ड्रेस घालून कोणाला काही दाखवायची गरज आहे का? मी तिला असा विचारल्यावर तिने मला उत्तर दिलं ' हे माझे लाईफ आहे, मला काय हवं ते मी करू शकते, तू कोण विचारणार?' मी असें कपडे घालून हिच्यासोबत गेलो तर तिला चालेल का? आम्ही गेली अकरा वर्ष एकेमेकाच्या प्रेमात आहोत, तिने मला असा उत्तर दिल्यावर मी माझा फोन फेकून दिला त्याचे दोन तुकडे झाले, मग मी माझे दोन्हीं हात भिंतीवर आपटले जोरजोरात मग ते दुखायला लागले तेव्हा कळलं की तीन दिवसानंतर माझी exam आहे....मी पेपर कसा लिहिणार. ज्या मुलीवर मी अकरा वर्ष प्रेम करतोय ती अशी दगाबाज निघाली, मला माझीच लाज वाटतेय मी काय करू? मला सांगा मुलींना असे शॉर्ट ड्रेस घालायच गरज काय पडते?
उत्तरं - १. अरे तू म्हणजे अर्जुन कपूर निघालास, मलायका अरोरा आणि त्याच्यात पण एवढंच अंतर आहे ...पणं तो कूठे तिच्या कपड्यावर ऑब्जेक्शन घेतो... घेतलं...तरी ती त्याचं ऐकते का? नाही....मग तू कशाला ऑब्जेक्शन घेतोस?
२. तू लॉ स्टूडेंट आहेस् आणि आम्हालाच उत्तर विचारतोस? तू कसा काय लोकांचे प्रॉब्लेम solve करणारं...तुझा तुला solve करायला जमतं नाहीं मग. इझी आहे सोडून दे तिला. प्रेमभंग आयुष्यात कितीही वेळा होवू शकतो.
३. फोन फेकलास तो महागाचा होता ना...तूझ्या कमाईचा नक्किच नसणार, आईबाबानी दिला असणारं....अरे फोन सारखा सारखा घेता येत नाही. त्यात आपले किती महत्त्वाच्या गोष्टी असतात....आता तो repair केला तरी तुझा किती डेटा गेलेला असेल.... फोनच ऐकून वाईट वाटलं.
४. लॉ स्टूडेंटना एवढा अभ्यास असतो आणि तू म्हणतोस की तू अकरा वर्षापासुन म्हणजे तूझ्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून तिच्या बरोबर relationship मध्ये आहेस....तुला अभ्यास करायला कसा जमला रे ? इतक्या वर्षात ती तुला कळली नाही का तूच तुला कळला नाही? मग तुला लॉ काय कळणार? तू जर का तिच्यावर प्रेम करतोय तर मग शॉर्ट ड्रेस ही खुप छोटी गोष्ट आहे...तुला एवढी मोठी का वाटली? ...माफ कर दे, वैसे भी वो उमर मे बडी भीं हे तो वो भी तुझे माफ करेगी.
हे उत्तर मजेशिर आहे वाचां....
५. फोन लगा तू अपने दिलको जरा पूछ ले आखिर है क्या माजरा ....पलमे संभालता हैं, पलमे फिसलता है.... कन्फ्युज करता हैं... बस क्या...
६. तू असें कपडे घातले तर चालतील का? असे विचारतोय....म्हणजे तू नक्की कसे कपडे घालणार? हे पण टाक....आम्हाला कळेल.
अशी अनेक उत्तर वाचून मलाच हसू आले की लोकांनी असे अनेक उपाय सुचवले पणं कोणीही त्याला परिक्षा आहे अभ्यास कर म्हणाल नाही. (एकाने तर फोन आपटलास हे वाईट केलं...अस पणं सांगीतलं.) तुझा हात आपटलास तो कसा आहे, तू त्यांच्यावर ट्रीटमेंट करून घे कारण तुला परीक्षेला बसायचं आहे... तुझे करिअर महत्वाचं आहे...प्रेम नाही.
ह्या उत्तरातून त्याला काय बोध होईल देव जाणे....तो परत तिच्याकडे जाईल का? अभ्यासावर लक्ष देऊन त्याचं करियर नीट करेल? प्रेम आंधळं असतं, पणं किती ? आपलाच आपल्यावर विश्र्वास नसतो.
🙏 वंदना ❤️