Bluepad | Bluepad
Bluepad
कसा होईल जर या गोष्टींना मान्यता दिली तर........
Shreyas Ghadge
Shreyas Ghadge
3rd Aug, 2022

Share

कुठलाही व्यक्ती जेव्हा या जगात येतो तर तेव्हा त्याला संपूर्ण गोष्टींची जाणीव होते एका दिवसात सगळ्या गोष्टी शिकणे शक्य नसते परंतु प्रत्येक गोष्टीची जाणीव त्याला वारंवार होणाऱ्या घडामोडीनुसार कळल्या जाते. आणि अशाच काही घटकांना विशिष्ट स्वरूपाने बघितल्यानंतर त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन व्यक्ती ठरवतो. प्रत्येक घटना बद्दल देखील प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक मत असते जे विशिष्ट दृष्टिकोनाने व विशिष्ट स्वरूपाने बनलेले असते. सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की व्यक्ती त्याचं मनोगत व्यक्त करण्याकरिता त्याची विचारसरणीचा दृष्टिकोन नेमतो. जो बहुतांशपणे विशिष्ट दिशेने वाढलेला असतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिळणारा निकाल हा गोष्टीचा शेवट ठरतो. तुम्ही कसल्या दृष्टिकोनाने विचार करता हे महत्त्वाचं नाहीये तुम्ही कसल्या दिशेने आपले पाऊल टाकत आहे देखील तेवढे महत्त्वाचं नाही. परंतु तुमच्या मताचा शेवट हा कसल्या प्रकारचे निकाल घोषित करतो, तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
            मनुष्याचा जन्म हा झालाच त्या दृष्टिकोनाने असतो ज्यात त्याच विभाजन विशिष्ट स्वरूपांची होते. असे देखील म्हणू शकतो की मनुष्याचा प्रवास हा अगदी रेल्वेगाडी सारखा आहे. ज्या प्रत्येक प्रकारच्या स्टेशन वरती पोहोचल्यावरती त्याला एक विशिष्ट शहराची ओळख होते. आणि तिथल्या राहणीमान आणि तिथे देखरेख केल्यानंतर स्वतःची आवड निर्माण करून घेतो. आणि प्रत्येक गोष्टीला रमणीय वाटून घेणे किंवा न घेणे हे व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून करते.जर सुरुवात भविष्यात चालवणाऱ्या पिढ्यांची जर केली तर कसं होईल जर त्या पिढ्यांना उत्तम दर्जाचे मार्गदर्शन देऊन त्यांना हवे त्या क्षेत्रात गेल्यानंतर त्यांच्या आवडीनुसार आणि मागणीनुसार मार्गदर्शन देण्याची मान्यता दिली तर. संपूर्ण ठिकाणी प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक बाबतीत सर्वात मोठा फरक पडतो तो असतो बोलण्याचा जोपर्यंत व्यक्ती मन उघडून पूर्णपणे त्याच्या गोष्टी जगासमोर मांडत नाही तोपर्यंत त्याचं नेमकं मनोगत काही लोकांना कळत नाही. आणि त्यावर तीच एक गोष्ट सर्वात महत्त्वाची अनुभवायला मिळते ती म्हणजे भविष्यात गेल्यानंतर व्यक्ती त्या गोष्टींचा पश्चाताप करतो तेव्हा त्याला असं वाटतं की तेव्हा विचारलं असतं तर आज कदाचित आयुष्य थोड वेगळ असत. एका प्रसिद्ध अशा व्यक्तीने म्हटलं होतं, रिस्क is ऑलवेज बेटर दॅन regret. तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत कुठेतरी तुमचं मन असतं दृष्टिकोनानेच प्रवास करत राहील असे देखील म्हणतात की भविष्यात काही गोष्टी गेल्यानंतर त्याचा अन्याय देखील तुमच्यावरती कुठेतरी होऊ शकतो. परंतु आपण सगळे अशा चक्र वी मध्ये फसून जातो की जिथे आपले मनोगत व्यक्त करण्यात एक कुठेतरी धोका वाटतो. मनाला पूर्णपणे प्रामाणिकपणा मिळत आहे असे जाणवत नाही.ज्याकरिता बहुतांश लोकांची मदत देखील घ्यावी लागते त्यांना देखील तुमचे मनोगत पाठवून देण्याची ती एक वेळ येते.एवढेच म्हणता येईल की जर तुमचं मनोगत हे पुढील भविष्याकरिता शंभर टक्के निकाल देऊ शकत असेल तर कदाचित तुमच्या मागण्या पूर्ण देखील होईल परंतु त्यासाठी काही कायदेशीर नियमांना देखील पाळावा लागतो नियमांच्या विरोधात जर तुमचे काही मनोगत असेल तर कदाचित त्यांना पूर्णपणे मान्यता मिळू शकत नाही.
          सर्वप्रथम जर महत्वाची गोष्ट केली तर एक अशा व्यक्तीची ज्याचे विषय म्हणजे बहुतांश लोकांना स्वप्नात देखील येत नसेल तो म्हणजे सर्वात मेहनती "शेतकरी". त्या व्यक्तीबद्दल कदाचित बहुतांश लोकांनी आपलं मनोगत मांडले देखील आहे काही लोकांनी आपल्या मनोगत संपूर्ण जगासमोर देखील मांडण्याचा प्रयत्न देखील केला आहे आणि अजूनही ते प्रयत्न सुरूच आहे. एवढेच नाही तर त्यासाठी बरेचशे महत्त्वाचे विषय देखील कार्यक्रम देखील मांडले गेले आहे. पण काय होतं की 100% देऊन देखील त्यांना त्याचा 70% देखील त्याचा उपभोग मिळत नाही आहे त्यांचे मुळात कारण हे आहे. की त्यांच्या मागण्या पूर्ण करून ज्या व्यक्तीच्या हातात नियम कायदे बनलेले आहे त्यांचा मुळात पाहिजे तसा त्या दृष्टिकोनाने नफा होत नसेल.त्यांच्या विषयांना सोडवून कदाचित त्यांचे प्रश्न सोडवल्या गेल्यासारखे वाटत नसेल असे देखील होऊ शकते. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांबद्दल बहुतांश लोकांना आपले मनोगत व्यक्त करण्यातच एक मोठेपणा वाटतो. परंतु त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल बहुतांश लोकांना कल्पना देखील नसते. की कसल्या दृष्टिकोनाने त्यांचे नुकसान होते कसल्या दृष्टिकोनाने हवामान देखील त्यांच्यासोबत खेळून चालले जाते. मुळात सांगण्याचा तात्पर्य ही आहे एक असा व्यक्ती जो निडरपणे आपल्यासाठी काटकसर करतो परंतु त्याला पाहिजे तसा मानसन्मान मिळत नाही. पण बहुतांश वेळेस असं देखील होतं की ज्या व्यक्तीचा लग्न जुळण्याची वेळ येते त्याला सर्वात पहिला प्रश्न हाच विचारला जातो की तुझ्याकडे शेती किती आहे? मनोगत प्रत्येक व्यक्तीचा असते प्रत्येक व्यक्तीला मनोगत व्यक्त करण्याचा एक हक्क देखील मिळाला आहे. खायला गोष्ट हवामानाचा तर तो कोणत्याही व्यक्तीच्या हातात नाहीये त्यासाठी नैसर्गिक जीवनच एक भाग आहे एक नशिबाचा तो खेळ आहे की ज्यानुसार हवामान तुमच्या मनानुसार होईल. पण कसं होईल जर शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता त्यांची थोडी मोठ्या प्रमाणात मदत करण्याची मोहीम राखल्या गेली तर...कदाचित असे देखील होऊ शकते किती मोहीम राखल्यानंतर त्यांचा उत्साह थोडा जास्त मोठ्या प्रमाणात एक मनोबल वाढण्याची जी गरज असते ती मनोबल त्यांना मोठ्या प्रमाणात मिळण्याची एक मदत होऊन जाईल जेणेकरून पीक पिकविण्याची एक विशिष्ट प्रकारची शक्ती त्यांच्यात निर्माण होईल. ज्या शेतकऱ्यांनी सर्वात उत्कृष्ट प्रमाणे काम केले जर त्यांना सरकारकडून काही बक्षिसांची देणगी देण्यात आली तर कसं होईल. असे बहुतांश बरेच प्रश्न आहेत बरेच गोष्टींना मान्यता देण्यास कदाचित सरकारला व जनतेला विशिष्ट प्रकारच्या गोष्टींची चर्चा करावी लागेल कारण चर्चा शिवाय कोणत्याही गोष्टीचा मार्ग निघत नाही. त्या मार्गाकरिता काही गोष्टी अशा देखील असू शकते की ज्यांना नियमांच्या नुसार पूर्णता शक्यता होऊ शकणार नाही परंतु शंभर मधून काही गोष्टी तर अशा आहे ज्या नक्की सरकार ठामपणे करू शकते.जर चर्चासत्र केली तर कदाचित आणखी काही समस्या निघतच राहील आणि त्यात कोणी काही करू शकत नाही कारण समस्यांना कधीही पूर्णविराम लागणे म्हणजे अशक्यच आहे त्यामागे आणि त्यासमोर नेहमी स्वल्पविरामच दिसणार.आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे की शेतकऱ्यांचा जर विषय असेल तर त्यात स्वल्पविराम यांची कमी मुळीच नाही आहे. या जगात असा कुठलाही शेतकरी नाही झाला असं वाटते की त्यांचा मुलगा देखील शेतकरी असला पाहिजे. कारण त्या क्षेत्रात एक वेगळीच धास्ती मनुष्यांना बसलेली आहे. आणि त्याकरिता सगळ्यांना माहिती असून देखील सगळे नाव माहित असल्याप्रमाणे वागतात ज्याला बहुतांश वेळेस आपण भ्रष्टाचार या शब्दाने देखील ओळखतो. खरंतर या जगात असा एकही व्यक्तीने की ज्याच्या मनोगतात हा शब्द निघालेला नाहीये की भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्टीचा एक मोह असतो तो मोहा चढला तर तो निघणे आणि काढणे अत्यंत कठीण होऊन जाते. प्रत्येक व्यक्तीला मान्यता तेव्हाच मिळते जेव्हा संपूर्ण लोकांचा त्याला एक वेगळी सोबत मिळते. जर तुमचे चहिते ज्या गोष्टींना करायला लावतात तर ती गोष्ट चुकीची असली तरी देखील ती आवडायला लागते. संपूर्ण जगात असे बरेचसे चहिते देखील आहे जे प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने बनलेले आहे बहुतांश ते देखील काही गोष्टींना मान्यता देण्याकरिता आपले मनोगत व्यक्त करतात परंतु बहुतांश त्यामागचं राजकारण असते की त्यांना त्याकरिता काही विशिष्ट प्रकारची रक्कम मिळाल्या जाते याकरिता ते आपल्या मनोगत व्यक्त करतात हे आता जग जाहीर झालेला आहे.पण जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनानुसार जर निर्णय घेऊन कुठल्या गोष्टींना कुठल्या प्रकारची मान्यता मिळायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींवर ती निर्बंध लागायला पाहिजे याबद्दल जर प्रत्येक व्यक्तीचे जर विचार हे मजबूत झाले तर तो दिवस देखील दूर नाही. ती व्यक्ती स्वतःच्या मनानुसार निर्णय घेण्यास ठामपणे उभा राहील.परंतु या गोष्टी करिता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास एक तरी संधी मिळायला पाहिजे. जेणेकरून कुठल्या दृष्टिकोनातील कुठली बाजू ही मजबूत करायची आहे याची लोकांना जाणीव होईल.
लेखक - श्रेयस घाडगे

172 

Share


Shreyas Ghadge
Written by
Shreyas Ghadge

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad