Bluepad | Bluepad
Bluepad
Title

Balaji Mehtre
Balaji Mehtre
3rd Aug, 2022

Share

अर्ज
दि.03/08/2022
प्रति,
मा.सरपंच/ग्रामसेवक साहिबा,
ग्रामपंचायत कार्यालय,खोपेगाव.
विषय : 1) दलित वस्तीतील मरक्युरी (स्ट्रीप लाईट) दुरुस्ती झाली नसून ती तपासुन चालू करावी
2) प्रधानमंत्री घरकुल योजनेतील मंजूर 119 घरकुलची फेर तपासनी करून जास्तीत जास्त घरकुल देण्यात यावेत व नवीन घरकुल प्रस्ताव सादर करावेत.
3) गोपाळ नगरी येथील दोन वर्ष बंद पडलेला पाणीपुरवठा चालू करणे
4) एक वेळेस संपूर्ण कर भरनाऱ्यास(घरपट्टी व नळपट्टी) 30% सवलत मिळणे
5) दोन नवीन लाईट DP बसवने बाबत..
महोदय,
वरील विषयास अनुसरून विनतिपुर्वक अर्ज करण्यात येते की बालजी अशोक म्हेत्रे ग्रामपंचायत कार्यालय,खोपेगाव सदस्य असून विषय क्र 1 नुसार दलित वस्तीतील मरक्युरी(पथदिवे)स्ट्रीपलाइट दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत मार्फत काढुन घेऊन गेले होते व दुरुस्त करून लावलेही असे आदरणीय सरपंच आणि ग्रामसेवक साहिबा यांनी आम्हाला सांगितलं परंतु लिंबराज मारुती रनसुळे यांचे घरासमोरील स्ट्रीप लाईट वगळता कुठलीही स्ट्रीप लाईट दुरुस्त झाली नाही चालू झाली नाही उलट सीताराम तातेराव कांबळे यांच्या घरसमोरील 4 पैकी 2 स्ट्रीप लाईट आहेत,अशोक तुकाराम मगर यांच्या घरसमोरील 4 पैकी 3 आहेत,सचिन प्रकाश शिंदे यांच्या घरसमोरील 4 पैकी 3 आहेत,गौतम दमोदर मादळे यांच्या घरसमोरील 4 पैकी 3 आहेत व महादेव दिगंबर शिंदे यांच्या घरसमोरील 4 पैकी 3 च आहेत या सर्व दुरुस्त झालेल नाही बंद आहेत त्या पूर्ण चालू करून 4 पैकी 4 हि स्ट्रीप लाईट चालू करून बसवावे व आम्हाला चालू करून दाखवावे जेणेकरून वस्तीत प्रकाश अभावी काही धोका निर्माण होणार नाही.
विषय क्र 2 नुसार ग्रामपंचायत कार्यालय मध्ये प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत 119 घरकुल मंजूर झाली होती नंतर काही दिवसानंतर त्यातली काही नाव कमी करण्यात आली त्याची यादी ग्रामपंचायतीतुन मंजूर-नामंजूर प्रसिद्ध केली नाही किंवा फलकांवर लावली नाही.या मंजूर 119 घरकुलाची फेर तपासणी करून सर्व मंजूर करून घ्यावे व याबरोबर नवीन घरकुलाची पुष्कळ नागरिकांना आवशकता आहे याव्येतरिक्त नवीन घरकुल प्रस्ताव घेऊन दाखल करावे.
विषय क्र 3) नुसार गोपाळ नगरी हा खोपेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा भाग असून दोन वर्ष झाली तेथील नागरिकांना पाणीपुरवठा नाही.तेथील नागरिक वारंवार ग्रामपंचायतला पाण्याची समस्या सांगत असतात तरीही त्यांना ग्रामपंचायत गोपाळ नगरी भागात पाणीपुरवठा करत नाही.नागरिकांना स्वतःची घरे असल्यामुळे तेथून जाताही येत नाही व पाणी विकत घ्यावं लागत त्यामुळे आर्थिक समस्याला तोंड द्यावं लागत आहे आणि स्वतःचे पैसे देऊन पाणी खरेदी करूनही ग्रामपंचायत पाणी कर नागरिकांवर लादत आहेत त्या ठिकाणचा पाणीपुरवठा चालू करावा व दोन वर्षाचा पाणी कर माफ करावा.
विषय क्र 4 नुसार आपल्या गावातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपुरवठा कर सर्वांनां पावती घरपोच केलेली आहे.हा अचानक आलेला कर पाहून नागरिक घाबरून गेली आहेत.आपल्या गावातील सर्व नागरिक साधारण शेती मजुरी करणारे आहेत मार्च 2020 पासून आज पर्यंत covid 19 (Corona) मुळे जगाबरोबर आपल्यालाही या संकटाला तोंड द्यावं लागले आहे त्यामुळे सगळ्यांच आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे आज गावातील परिस्थिती शाळेत,कॉलेज मध्ये फीस भरण्यासाठी नागरीकांजवळ पैसे नाहीत.या कडे लक्ष केंद्रित करता जे दोन (50%-50%) टप्यात संपूर्ण कराचे पैसे भरतील त्यांना 30%सवलत या संपूर्ण वर्षात (2022-2023)द्यावी.त्यामुळें सवलत देऊन आपण गावाचीच सेवा करतोय,गावातील कर गोळा करून त्याच ग्रामनिधित त्यांची सेवा करणार आहोत,त्यापेक्षा सवलत देऊन सेवा करूया व नागरिकांना हि त्याच समधान असेल व करही लवकर भरतील आणि त्यांचावरही पैशाचा ताण येणार नाही.
विषय क्र 5 नुसार गावातील महावितरण याचा विचार केला असता गांवात सतत लाईट जातं आहे लाईट गेल्यामुळे गावाला अतिशय त्रास होत आहे.लाईट जाण्याचे मुख्य कारण गावातील DP वर पकडणारा लोड गावात जास्त प्रमाणात शेतकरी वर्ग आहे शेतीला पाणी देण्यासाठी रात्री अर्ध्या रात्री शेतात जातं असतो त्यामुळे नागरिकांना कोणत्याही धोक्यास सामोरे जावे लागेल व गावामधेही लाईट जात असतें.यामुळे नवीन दोन DP बसवण्यात याव्यात जेणेकरुन लाईट चा लोड कमी होईल व नागरिकांना लाईट पूर्ण वेळ भेटू शकेल.
वरील सर्व 1 ते 5 हे विषय गावाच्या व गावच्या नागरिकाचा हितचे आहेत आणि 26 जानेवारी 2022 ग्रामसभा झाली व ती पण ऑनलाईन नंतर एकही ग्राम सभा झाली नाही त्यात मोबाईल वापर जमत नसल्यामुळे ग्रामसभा उपस्थिती 10-12 होती त्यानंतर हि पहिलीच ग्रामसभा आहे.या सभेत हे विषय मांडून पूर्ण करावे
तरी आदरणीय सरपंच/ग्रामसेवक साहिबा यांनी दि04/08/2022 च्या ग्रामसभेत मांडून ठराव पारित करावे,हि नम्र विनंती .
आपला विश्वासू
नाव : बालाजी अशोक म्हेत्रे.
सदस्य,ग्रामपंचायत कार्यकाल,खोपेगाव

0 

Share


Balaji Mehtre
Written by
Balaji Mehtre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad