फुल असे उमलताना
अलगद पाकळी फुलताना
गंध वाऱ्यासवे पसरत जाता
एक एक पदर बाजूला होता
रंग संगती खुलून दिसती
मोदाने हलती डूलती
पर्णाला बिलगून बसती
रवी किरणे प्राशूनी घेती
थेंब दवाचे मोती दिसती
हिरे जडवले अंगावरती
हृदयात अमृत घट किती
दान देऊन तृप्त होती
अल्प आयुष्य लाभते
सार्थक त्यांचे होते
त्यागाने जीवन असते
निर्माल्यही सार्थकी लागते
उर्मिला आपटे, सातारा.