आपल्या पोटच्या लेकीचा लेकाचा संसार सुखी व्हावा अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. आणि असायलाच हवी. मला अनेकवेळा हा प्रश्न पडतो की आपली लेक सुखात असावी. सुख ह्या शब्दाची व्याख्या तरी नक्की काय?आज माझे अनेक मित्र लग्नाचे आहेत. त्यांच्यासोबत कधी संभाषण झालं तर ते म्हणतात मुलींच्या अपेक्षा खूप आहेत,पालकांच्या अपेक्षा खूप आहेत.
मुळात कस आहे की मुलींच्या पालकांच्या अपेक्षा खूप आहेत ह्यापेक्षा पण मुलांची कर्तबगारी, व मुलींच्या सुखाची एकंदरीत व्याख्या ह्यादेखील महत्वाच्या असतात कारण वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करणं आणि मुलांनी देखील आपल्याला नाकारलं जाऊ नये एवढी सुबत्ता प्राप्त करायला हवी. अजून एक कारण म्हणजे वरकरणी आपल्याकडे हुंडा पद्धत बंद झाली असली तरी बैठक किंवा याद्या ह्या कार्यक्रमात ह्या गोष्टीचे मोजमाप केलेच जाते आणि देवाण घेवाण देखील केली जाते.दोन वर्ग मोडतात सध्या समाजात मुलं नोकरी निमित्ताने परगावी असली की तिथली जी संस्कृती आहे ती जोपासतात आणि गावाकडे घेऊन येतात तेव्हा जुनी मुळं त्यांना नाव ठेवतात अगदी ह्या गोष्टी चारित्र्यपर्यंत येऊन पोहोचतात अशावेळी खूप अंशी मग मुलं देखील त्यांची त्यांची अशी चॉइस ठरवून घेतात.
आज खरंतर पालकांनी स्थळ बघताना लग्न ह्या संस्थेवर आधी पूर्ण विश्वास ठेवायला हवा.जशी आपली मुलगी तशीच आपली सून आणि जसा आपला मुलगा तसाच आपला जावई अशा नजरेतून मुलांकडे बघायला हवं. मुलात आणि जावयात कोणतीही अशी स्पर्धा नाही आणि सुनेत आणि आपल्या मुलीमध्ये देखील कोणतीही स्पर्धा नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा हवा का तर हवाच पण त्याचा अहंकार होता काम नये कारण कमवणारा वेगळाच आणि त्याची जाहिरात करणारे पालक ह्यांनी ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा तरच येत्या काळात लग्न ही संस्था आणि नव्या पिढीचे असणारे त्यासंबंधीचे विचार बदलतील.