Bluepad | Bluepad
Bluepad
झेप
S
Shital Santosh Ingle
3rd Aug, 2022

Share

तुच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार
घे उंच झेप तू , तुझ्याच हाती घेउनी तुझ्या दुनियेचा कारभार.
जरी तुझ्या पायी अडकवलेले असतील समजरूपी बेडे , आयुष्यात होणारे प्रत्येक प्रवासात असे अनेक सोडवावे लागतील तुला कोडे. तरी तुझे असुदे एकच लक्ष्य ,
घे उंच झेप तू , तुच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार.
जरी तुझ्या विरुध्द कोणी कितीही रचत असेल डाव, तरी ठेव तुझ्या मनात सर्वानविषयी आदरभाव. तुला त्रास देणाऱ्यांचा सुद्धा कर तू सन्मान,आयुष्याचा वाटेवर असे अनेक भेटतील तुला शिशुपाल. पण तरीही असुदे तुझ्या मनात प्रेमरूपी भाव.
घे उंच झेप तू, तुच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार.
जरी तुझ्या कोणी कितीही केला तिरस्कार, न डगमगता तुझे मनोबल तुझ्या मनावर असुदे तुझ्याच राज. आयुष्याचा वाटेवर चालताना कर सर्व दुःखाचे काटे पार होणार तुझ्या आयुष्याचा महोत्सव .
घे उंच झेप तू, तुच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार.
देव बनण्यासाठी मानस जन्मात येऊन देवाला सुद्धा सहन करावे लागले माणसांनचेच वार. सर्वात श्रेष्ठ मानवरुपी जन्म, मानवता हाच सर्वात मोठा धर्म. नको करू या जन्मास व्यर्थ जणू भुमिला सुद्धा तू होतास भार.
घे उंच झेप तू, तुच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार.
शितल.....

198 

Share


S
Written by
Shital Santosh Ingle

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad