Bluepad | Bluepad
Bluepad
पुर्नजन्म
Milind Joshi
Milind Joshi
3rd Aug, 2022

Share

पुर्नजन्म ही संकल्पना कुणाला पटो अथवा न पटो, कुणी मान्य करो अथवा न करो... मला मात्र जाम आवडते. म्हणजे बघा, जी व्यक्ती आपल्याला कायमचे सोडून गेली, तीच व्यक्ती नव्या रुपात परत येते आणि आपले विरहाचे दुःख कमी करण्यात हातभार लावते. किती मस्त वाटते ना?

अनेकदा मी कनकला... ‘ए माझी आई...’ असे म्हणतो. मी लहान असताना माझे बालपण आईला फारसे बघता आले नाही. कारण मी १ वर्षाचा असतानाच मला आक्काकडे ( माझी आत्या ) ठेवले होते. नंतर चौथी पर्यंत मला माझी आई कोण हेही समजत नव्हते. मी कायम आक्काच्या मागे. आक्काने मला आईपेक्षाही जास्त प्रेम दिले हे निर्विवाद सत्य आहे. आक्कासाठी मी म्हणजे तिच्या वडिलांचा पुनर्जन्म. माझ्या रूपाने आक्काचे तिच्या वडिलांच्या ( म्हणजे माझ्या आजोबांच्या ) विरहाचे दुःख कमी होण्यास मदत झाली. कनकच्या रूपाने माझ्या आईच्या विरहाचे दुःख कमी होण्यास मदत होते आहे.

आता मी सगळ्यांना सांगतो, मी आईपेक्षा जास्त भाग्यवान आहे. आईला माझे बालपण फारसे अनुभवता आले नाही, पण कनकच्या रुपात मी आईचे बालपण अनुभवतो आहे.

जानेवारी २०१४ पर्यंत मला आईचे ऐकावे लागत होते. कारण ती माझ्यापेक्षा मोठी होती... आता? आताही मलाच तिचेच ऐकावे लागते... कारण ती लहान आहे. हेहेहे...

थोडक्यात काय तर आपण फक्त ऐकून घ्यायचे... पण एक सांगू... ही मजाच काही और आहे...


पुर्नजन्म

174 

Share


Milind Joshi
Written by
Milind Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad