आज देती हुलकावणी
एकट्याची झुंज माझी
झुंजार त्या वार्यासवे
खोल जरी पाळेमुळे
जगतो फक्त जगण्यास्तवे
काल जे आश्रयी होते
दुरून बघती मजला
पंखात बळ ते येता
उडून जाती आता
संपलेल्या हिरवळीचि
आस लागली पुन्हा
किलबील पाखरांची ची ऐकण्या
उभा राहतो पुन्हा
परीसरातील हिरवाईची
सुखद ओल अजुनी
अंतरंगी रुक्ष पान्हा
येतो पुन्हा दाटूनी
* * *
अतुल कोयाळ
31 जुलै2022