जेव्हा पहिल्या दिवशी आपण शाळेत गेलो होतो. नवीन कपडे, नवीन बॅग,आणि नवीन नवीन पुस्तक. आणि आई बाबांचे मोठे मोठे स्वप्न. कोणाच्या चेऱ्यावर हसू तर कोणाच्या चेहऱ्यावर. रुसू. आणि घरी जाण्याची घाई तर प्रत्येकालाच होती.
फ्री पिरेड भेटाच PT, PT ओरडण आणि मॅडमला. ग्राउंड वर जाण्यासाठी मजबूर करण. आणि कधी अभ्यास नंतर मॅडम ला जोक ऐकवाला लावण आणि सुरुवातीला स्टाफरूम मध्ये जायची ती वेगळीच excitement आणि कधी स्टाफ रूम मध्ये न जाण्याचा बहाणा मारण
एका मुलाला बाहेर जायची परमिशिन भेटली की पूर्ण क्लास च त्याच्या हाती बॉटल देणं. आणि क्लास ला शांत करण्यासाठी मी मारेल अशी मॅडमची डायलॉग मारण आणि सर्वच टीचर चे funny funny नाव ठेवण. एक एक करून पाणी पिण्यासाठी सुट्टी मागणं. आणि पंधरा वीस मिनिट बाहेरच थांबन. क्लास मध्ये येताच नको नको ते बहाणे बनवणं. शाळेत कोणाचे आई बाबा येताच लगेच त्यांना सांगणं. तर कधी बाबांचे नाव घेऊन एकमेकास चिडवण मधल्या सुट्टीत कधी दुकानात तर कधी एक दुसऱ्याची खिल्ली उडवन... शाळेतील जिवन खरचं मस्त होत यार ..
कु. रुचिता विलासराव निकम
रा. तळणी