Bluepad | Bluepad
Bluepad
वजन वाढणे.. जाडेपणा
प्रतिभा
3rd Aug, 2022

Share

परवा एका असे जाड दिसणाऱ्या मुलीला मी पाहिलं छोटीच होती वयाने .
वन पीस घातला होता तंग आणि जाडी लपवण्याचा प्रयत्न करत होती पण त्यामुळे त्या वनपीस मुळे खूपच विचित्र दिसत होती टाईट कपडे घातल्याने का वजन लपवता येतं ?
पण हे कळतच नाही वजन हे वजन असतं. जाडेपणा घालवायचा असेल तर मनापासून प्रयत्न करावा लागतो ओव्हरवेट असणे, जाड असणे, गरजेपेक्षा जास्त वेट गेन करणे यांसारख्या समस्यांमुळे जगभरातील असंख्य लोक चिंताग्रस्त मनस्थितीमध्ये असतात. लठ्ठपणा हा आजार जागतिकदृष्ट्या सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. लठ्ठपणामुळे मेटाबाॅलिज्ममध्ये बिघाड होणे, हाय ब्लडप्रेशर, हाय ब्लड शुगर, पुअर ब्लड लिपीड प्रोफाइल हे आजार बळावू शकतात.
वाढते वजन हा बहुतांश लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. हे वाढणारे वजन घटवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. हे सर्व करताना वाढत्या वजनामागील कारणे जाणून घेतली जात नाही
आजच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक कष्टांचा अभाव आहे. सध्या बहुतांश कामे ही बैठ्या पद्धतीचीच आहेत. लठ्ठपणाचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी घरी रोजची भरपूर कामे करताना, आपोआप व्यायाम होत असे. जसे जात्यावर दळण काढणे, विहिरीवरून पाणी आणणे, घर सारवणे, उखळ-मुखळ वापरणे, गाड्यांचा वापर नसल्यामुळे भरपूर पायी फिरणे, या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनशैलीचा रोजचा भाग होत्या; त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत होती. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अशी कष्टाची कुठलीही कामे रोज करावी लागत नाहीत. त्यामुळे रोज व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनीच रोज एक तास व्यायाम करावा. बैठी जीवनशैली बदलली, तर वजन नियंत्रणात आणता येईल.
जीवनशैलीत कामाव्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा भाग आहे, खाण्यापिण्याच्या सवयींचा. हल्ली बाजारातील पदार्थ खाण्याचे, शीतपेये पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आइस्क्रीम, चॉकलेट हे तर अनेकांकडे फ्रीजमध्ये आणून ठेवलेलेच असते, मग घरातील सगळे केव्हाही हे पदार्थ खाऊ शकतात. कुठलाही समारंभ असेल, तर किमान वीस-पंचवीस प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. टीव्हीवर सतत खाण्याच्या पदार्थांच्या जाहिराती सुरू असतात. एकूणच आपण फारशा पौष्टिक नसलेल्या, भरपूर बटर किंवा साखर असलेल्या खाद्य पदार्थांच्या सतत आसपास असतो. हे सर्व बदलले पाहिजे. भूक लागल्यावरच खाणे व आवश्यक तेवढेच खाणे हे पाळले पाहिजे. आपण काय खातो, यावर लक्ष असायला हवे. हल्ली मुली पर्समध्ये एखादि कॅडबरी ठेवूनच देतात .
का ?तर चक्कर येते म्हणून खायला पण त्यांना कुठे कळते की त्यामुळे त्यांचं वजन वाढते साखर वाढते .पोषकतत्व न देता भरपूर कॅलरीज देणारे पदार्थ खाल्ले, तर वजन वाढेलच.
आनुवंशिकता थायरॉईड औषधांचे साईड इफेक्ट्स यामुळे सुद्धा वजन वाढते
अनुवंशिकता बदलता येत नाही, काही वैद्यकीय कारणांमुळे वजन वाढले असेल, तर ते नियंत्रणात आणताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; परंतु जीवनशैली बदलणे, चांगल्या आरोग्यदायी सवयी लावणे, हे प्रत्येकाला शक्य आहे. ते केलेच पाहिजे. आपल्या स्वत:च्या शरीराची आपणच काळजी घेतली पाहिजे.
आपलं वजन वाढतंय किंवा वजन वाढलेलं आहे याचाच अर्थ आपण फिट नाही. वजन वाढणं ही केवळ एक प्रक्रिया नसून ती आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. या वजन वाढीचा आपल्या शारीरिक आरोग्यावर जितका परिणाम होतो तितकाच मानसिक आरोग्यावरही होतो ..वजन आणि शरीरातील चरबी वाढल्यानं रक्तदाब, हदयाशी संबंधित समस्या , मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका असतो. पण हे आजार शरीराशी संबंधित आहे. पण वजन वाढल्यानं शारीरिक आजारांसोबतच मानसिक आजारही उद्भवतात. याला अभ्यासक स्थूलतेमुळे निर्माण होणारा ‘जुळा आजार’ असं संबोधतात.बदलती जीवनशैली- वजन वाढ- शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरचे दुष्परिणाम हे एक चक्र आहे. हे चक्र भेटण्यासाठी स्वतःच्या मनाला पटवून घेतलं पाहिजे की नाही ही आपली जाडी होण्याची लक्षणे चांगली नाहीत वेळीच त्याला अटकाव केला लगाम घातला तर त्याच्यावर नियंत्रण येतं पण हल्ली या जाडेपणाबद्दल उगीचच भलतेस्तोम माजवले जात आहे .
मजा म्हणजे काही ना समजतच नाही की आपले वजन खूप वाढले आहे आणि लोकांनी दाखवले तर उलट त्यांनाच काही..बाई बोलून गप्प केले जाते
अहो आम्ही जाडे ...तुम्हाला काय त्याचे... म्हणूनच जाडेपण मिरवू लागलेली आहेत पण त्यांना कळतच नाहीये की हा जाडेपणा हा शेवटी त्यांना कधी ना कधी तरी घातक ठरणारच आहे.
प्रतिभा बोर्डे
वजन वाढणे.. जाडेपणा

175 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad