Bluepad | Bluepad
Bluepad
Title

🌺⃝🎀⃝⃕🅕🅡🅞🅩🅔🅝"सोनपापडी"
3rd Aug, 2022

Share

*गूढ अंतरीचे काव्यमंच, आयोजित उपक्रम.*
वार : *मंगळवार.*
दिनांक : *०२ ऑगस्ट २०२२.*
विषय : *घर दोघांचं.*
प्रकार : *लघुकथा.*
*" नव्हतं कधीच माझं प्रेम तुझ्यावर, मला फक्त टाईमपास करायचा होता आणि मी तो केला. आता गप्प तुझ्या वाटेने जायचं. "* मंगेशने आपली बाजू सरळ सरळ क्लिअर केली आणि तो निघून गेला.
कोणीतरी कानात उकळत तेल ओताव तसे त्याचे शब्द मोहिनीला त्रास देत होते. पण तिने स्वतःला सावरलं आणि घरी निघून आली. घरी आल्यावर दुसरा एक धक्का तिला मिळालं तो म्हणजे, तिलाच बघायला पाहुणे आले होते. ती तशीच पुतळा बनून दरवाज्यातच उभी राहिली. शेवटी आईच्या आवाजाने ती भानावर आली आणि आपल्या खोलीमध्ये निघून गेली. मनातून काहीच करायची इच्छा नव्हती पण आई वडील खुश होते आणि त्यामुळेच ती देखील तयार झाली. बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलाकडच्यांनी लगेच होकार दिला. स्थळ चांगल होतं, आईवडील खुश होते म्हणून मोहिनी देखील सगळं विसरून पुढे जायला तयार झाली. काही महिन्यांनी लग्न झालं आणि मोहिनी सासरी गेली.
नशिबाने सुरेख सासर मिळालं तिला. आई वडिलांसारखे सासू सासरे आणि फुलासारखं जपणारा नवरा. हळू हळू ती भूतकाळ विसरत होती. सुखी संसार सुरु होता. बघता बघता महिन्यावर महिने उलटत होते. पुढच्या दोन महिन्यांनी त्यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार होतं. दोघेही एकत्र आनंदी होते.
गुडमॉर्निंग बायको, हैप्पी अनिव्हर्सरी. त्याच्या गोड शब्दांनी तिची झोप चळवली. तिने देखील त्याला हसून प्रतिसाद दिला. दोघेही तयार होऊन खाली आले. सासू सासर्यांचा आशीर्वाद घेऊन मोहिनी कामाला लागली.
"संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जायचं आहे हा. तयारी करून रहा." मृग एवढं सांगून ऑफिसला निघून गेला.

0 

Share


Written by
🌺⃝🎀⃝⃕🅕🅡🅞🅩🅔🅝"सोनपापडी"

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad