Bluepad | Bluepad
Bluepad
झोका
Balaji G Dhote
Balaji G Dhote
3rd Aug, 2022

Share

उगाच लाहनाचा मोठा झालो मी
किती जिवाशी झाला हा धोका
बालपणच बरे होते जीवना माझे
आजही आठवतो मला तो हळवा झोका
फुलपाखरा सारखी ती उडून गेली
माझ्या मनात आठवणिचे घर करून गेली
नाही मिळणार आता तसा पुन्हां मोका
स्मरणात तिच्या सवे आहे आज तो झोका
ते पिंपळाचे झाड डौलदार फांदी
ती होती उनाड अन स्वच्छंदी
आज ही येतात मला तिच्याच हाका
छळतो आज पुन्हां तिचा तो झोका
राहिले एकटे माझ्या सवे झाड पिंपळाचे
कसे हे बंध झाले माझ्या तिच्या नशिबाचे
लागला चुकाया माझ्या काळजाचा ठोका
अनं पुन्हा आठवला तिच्या आठवणितला तो झोका..

167 

Share


Balaji G Dhote
Written by
Balaji G Dhote

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad