Bluepadती
Bluepad

ती

तेजल
15th Jun, 2020

Share

पंख नसेल तर पाखरू भरारी कशी मारणार? आणि असलेल्या स्वप्नात बळ नसेल तर उडायला सामर्थ्य कसे लाभणार? तसच सगळे उराशी स्वप्न बाळगूण तर असतात पण त्या स्वप्नांना बळ देण्याच् काम प्रत्येक वेळी होईलच असे नाही. आपल्या कड़े गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायी प्रमाणे एकेकाळी मुलींची स्थिती होती. आता ती परीस्थिती बदलत चालली असली तरी सगळीकडे हा बदल दिसत नाही. ती स्वप्न तर बघते पण त्या स्वप्नांना आभाळ मिळेलच असे काही नाही आणि तिच आभाळ तिला दिसलं तरी त्यात उडण्या साठी तिचे पंख समाजाने छाटायला नकोत. आपल्याला का प्रत्येक क्षेत्रात पहिली 'महिला' असं लिंग उद्देशक नोंद्वाव लागत? कारण सुरुवाती पासून तिला भेटत असलेल्या संधींचा अभाव हे आहे. हल्ली संधी आहेत त्यांनाही मर्यादा घालून ठेवण्यात येतात. प्रत्येक समाजात कल्पना चावला होऊ शकत नाही कारण तिला तिच्या सारखाच उपवर मिळेल काय? असं समाजमन आपल्या कड़े आहे. पण या सर्वात तिच्या मनाचा विचार कमी होतो. माणसाच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी, लग्न या अत्यंत महत्व पूर्ण बाबी आहेत पण मुलीच्या बाबतीत काही वेळा ह्या बाबींत तिचा निर्णय डावलला जातो. मुलगी प्रगल्भ, सामंजस असेल तर नक्कीच आपण तिच्या मतांचा विचार करायला हरकत नाही. सतत आपली मत लादल्याने तिची निर्णय घेण्याची क्षमता खुंटू शकते. आणि हे साचेबंद जोखड़ वाहता वाहता तिची स्वप्न हवेतच विरून जाण्याची शक्यता असते. आता वास्तवात मुलांना मिळालेल्या संधी तिलाही मिळू लागल्या आहेत, त्यांच सोन करण्याची ही वेळ आलीये. हा काळ सुद्धा तिच्याच् कामगिरीची वाट बघतोय... तिला शोध घेवू दिला पाहिजे स्वतःचाच... तिच्या गुणांना तिचे शस्त्र आणि ढाल बनवून जगाशी लढायची ताकद द्यायला हवी... निराशा,क्रुरता ह्या विरुद्ध पेटती मशाल तिच्या हातात द्यायला हवी... इसीस सारखी आतंकवादी संघटना त्यांच्या नियमांच्या विरुद्ध जाणाऱ्या जनतेला वेठीस धरून आहे. यात स्त्रियां/मुलींना गुलामा सारख वागवल जात. जगाच्या पाठीवर अशा अनेक स्त्रिया असतील. या महिला आणि मुली काय स्वप्न रंगवत असतील? पहिले तर तिथून सुटका करण्याच् असणार. लग्न तर लग्न , तलाक देखील समोरचा तीन वेळा म्हणून करवून घेतो आणि तिची किंमत पुन्हा शून्य असते. आपण माणूस म्हणून जगायच शिकू तेव्हाच अशा शोषित स्त्रियांना, त्यांच्या जगण्याला पंख देऊ शकू..


1 

Share


Written by
तेजल

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad