Bluepad | Bluepad
Bluepad
मी देव बोलतो...
Mukul Dhekale
Mukul Dhekale
14th Jun, 2020

Share


मी देव बोलतो...
कोणी मंदिरात तर
कोणी मंडळात मला सजवलं ,
कोणी सुखात तर
कोणी दुःखात मला आठवलं ,


आठवणीचं कसंय कि
आठवण काढायलाचं पाहिजे
असं माझं काही बंधन नाही ,

पण कामापुरतं आठवण काढणं
हे सुद्धा ethically बरोबर नाही|


देव असलो तरी
भावना मात्र माणसासारख्याच आहेत ,

कधी हैप्पी , कधी सॅड , कधी Overwhelming ,
तर कधी confused आहेत |


माणसा ,

मी तुला ठिकठिकाणी सांभाळून घेतो 
तसंच कधी तू सुद्धा मला समजून घे ,

मागितलेली ईच्छा पूर्ण न झाल्यास
सत्कर्माचे महत्व तुला ही कळूदेत

कारण दुष्कर्माची साथ सुरुवातीला चांगली
तर कालांतराने आपल्यालाच त्रासदायक ठरते ,
पण सत्कर्माची साथ हीच ध्येय पूर्तता करते ,
सद्गुणांना जवळ तर दुर्गुणांना लांब सारते |

आता तूच ठरंव
तुला नक्की काय करायचं आहे , काय नाही
माझं काय?
या विश्वात मी अनंतकाळ

'वाटलं' तर आहे ,
'वाटलं' तर नाही...


- @ मुकुल विकास ढेकळे ✨

7 

Share


Mukul Dhekale
Written by
Mukul Dhekale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad