आज समीर च्या शाळेत मिटींग होती म्हणून श्रुती ने ऑफिस ला सुट्टी टाकली होती आजच नेमका नवीन कोणी एच आर रुजू होणार होता . कसा असेल तो कोण जाणे? समजून घेणारा असेल तर ठीक असे तिच्या मनात आले . संध्याकाळी वैशु ला कॉल करून विचारू असे तिने ठरवले. ऑफिस सुटल्या नंतर तिने वैष्णवी तिची ऑफिस कलीग तिला कॉल लावला,हॅलो वैशु निघालीस का ऑफिस मधून ,हो ग खाली पार्किंग लाच आहे बोल. काही नाही अग तो न्यू एच आर आला होता का आज कसा आहे तो काही बोलला का मी रजे वर आहे म्हणून. चिल श्रुती,अग कसला भारी आहे तो एच आर एकदम जॉली गुड फ़ेल्लो ,मनमोकळा कोणत्याच अँगल ने एच आर वाटत नाही. दिसायला हॅन्डसम,मस्त पर्सनॅलिटी. तू बघ उद्या . बोलायला पण छान आहे. बर बर इतकंच विचारायचं होत मला. भेटू उद्या बाय. असे म्हणत श्रुती ने फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी श्रुती ऑफिस ला आली. एक एक करून सगळा स्टाफ येत होता. वैशु पण आली तिच्या कडे येत म्हणाली,श्रुती आता येईलच बघ तो हॅण्डसम एच आर. वैशु अग इतकं काय त्यात माणसा सारखा माणूस इतकं कौतुक नको करू त्याच. मग बघच तू नाही त्याच्या वरून तुझी नजर हटली नाही तर विचार मला.. गॉड काश मैं सिंगल होती उसे यु ही पटा लेती. हम्मम .. वैशु म्हणाली. ओह मॅडम जा आणि तुमचे टेबल सांभाळा ओके श्रुती बोलली. पाच च मिनिटात तो आला आल्या आल्या गुड मॉर्निंग ऑल ऑफ यु म्हणत आत आला. श्रुती ने मान वर करून पाहिले . मस्त ऑफ व्हाईट शर्ट ब्लु जीन्स ,उंच रुबाबदार,जिमची कसदार शरीरयष्टी गोरा ,उभा चेहरा,चेहर्याला शोभणारी दाढी असा तो . सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केले. तो श्रुती च्या टेबल जवळ आला,आणि म्हणाला,हॅलो मिस श्रुती काल आपली ओळख नाही झाली तुम्ही न्हवता ऑफिस ला. हो,काल मी रजे वर होते. ओके ,माय सेल्फ रोहन वर्मा न्यूली जॉईन धिस ऑफिस अँज एच आर.असे म्हणत त्याने श्रुती ला शेकहॅन्ड केला. श्रुती एकदम बावरली होती कारण इतकं फ्रॅंक आज पर्यंत कोणी ऑफिस मध्ये बोलत न्हवते,जो तो कामा पुरता आणि लंच टाईम ला तेवढ्या गप्पा व्हायच्या. पण हे रोहन रसायन जरा अजबच होते. ती ही म्हणाली मी श्रुती देशमुख. हो काल तुमच्या मैत्रिणी ने सांगितले तुमचे नाव. मग रोहन गेला त्याच्या केबिनमध्ये.त्याच्या केबिन ला दरवाजा काचेचा होता सो नेमका दरवाजा समोर त्याची चेयर होती. श्रुती ने रोहन कडे सहज पाहिले तर तो ही तिला पहात होता तिने नजर चोरली आणि खाली फाइल मध्ये पाहू लागली. खरच किती हॅन्डसम आहे हा, वैशु बोलली तसाच ,सारख त्याला पहावेसे वाटते अशी पर्सनॅलिटी ,हम्मम ही वॉज ऑसम!! श्रुती ला मनोमन हे पटले. लंच मध्ये सगळे एकत्र जेवत असत आज रोहन ही त्याच्यात येऊन बसला. खूप गप्पा मारत शेयरिंग करत जेवण चालले होते. अधून मधून रोहन ला श्रुती चोरून पहात होती तो होताच तसा श्रुतीच नव्हे तर ऑफिस मधील वैशु ,रीमा,साक्षी ही त्याच्या कडे बघत होत्या. खूप जॉली होता तो. श्रुतीला दहा वर्षाचा समीर होता तरी तिने स्वहताला वेल मेन्टेन ठेवले होते. आज ही तिला एकदा तरी वळून पाहण्याचा मोह अनेक पुरुषांना व्हायचा. मग रोहन काय अपवाद..!! श्रुती चे डोळे घारे होते सिल्की थोडे ब्राऊन केस,गोरा रंग दिसायला छानच होती ती. जेवताना बराच वेळ रोहन आणि तिची नजरानजर होत होती. असेच रोज बोलणे जेवण एकत्र वाहायचे खूप कमी वेळात रोहन ऑफिस मध्ये रुळला. व्हाटस अँप ग्रुप मध्ये रोहन चा डीपी पाहण्याचा मोह श्रुती टाळू शकत न्हवती. त्याच गोड बोलणं ,श्रुतीला कॉम्प्लिमेंट देणं,कुठेतरी तिला हवंहवंसं वाटू लागलं. शनिवारी सगळे कॅज्युल ड्रेस मध्ये यायचे ऑफिस ला. आज रोहन ने टीशर्ट आणि जीन्स घातली होती. टी शर्ट मधून त्याची जिम ची शरीरयष्टी एकदम भारदस्त दिसत होती. पुन्हा पुन्हा श्रुती ची नजर रोहन कडे जात होती. कसे असते ना माणसाचे मन खूप चंचल असते आणि विचित्र ही जे सुंदर आहे आकर्षक आहे त्या कडे ते ओढ घेत असते किती ही नाही म्हंटले तरी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी कडे मन जाते असे काहीसे श्रुतीचे होत होते. रोहन काय शेवटी एक पुरुषच त्याला काय फरक पडणार उलट समोरून एखादी स्त्री आपल्या जाळ्यात फसत असेल तर ! मग तो ही मुद्दाम श्रुती शी बोलायचा ,छान छान शेरो शायरी चे मेसेज करायचा. कसे असते की पुरुष हा शिकारी असतो आणि आपण त्याचे सावज व्हायचे की नाही याचा आपणच विचार करायचा असतो पण हे मन वेडे असते त्याला सारे काही कळत असूनही वळत मात्र नसते. श्रुती ला आता रोहन शी बोलल्या शिवाय आजिबात करमत नसायचे ,त्याच्या दिसण्याची बोलण्याची तिला भुरळ पडली होती. आपण कोणा ची तरी पत्नी आहोत आई आहोत हे ती विसरत चालली होती . या उलट प्रशांत श्रुती चा नवरा तो इंजीनियर होता जॉब करत होता पण कायम श्रुती ला सपोर्ट करणारा तिची स्पेस जपणारा असा. दिसायला ही बऱ्या पैकी छान तो ही वेळ मिळेल तसा जिम करायचा . त्यामुळे श्रुती सोबत त्याचा जोडा छानच दिसायचा लवमँरेज होते त्यांचे. खूप समजून घ्यायचा तो तिला. आणि खूप विश्वास ही होता त्याचा श्रुती वर,कधी ही त्याने तिचा फोन चेक करणे किंवा पार्टी पिकनिक ला ऑब्जेक्शन घेणे असे काहीच कधी केले नाही. खूप सुखात त्यांचा संसार चालू होता. यामुळेच श्रुती बेफिकीर होती.दिवसेंदिवस ती रोहनकडे आकर्षित होत चालली होती. रोहन आता तिला श्रुती डियर यु आर सो स्वीट इथं पर्यंत बोलण्यात त्याने मजल मारली होती आणि श्रुतीला ते आवडू लागलं होत.दोघ चॅट ही करत होते श्रुती आता ऑफिस ला छान तयार होऊन जात असे मग रोहन तिला नजरेनेच कौतुक करत असे. श्रुतीला आपण काय करतो आहोत कसे वागत आहोत याचे भान राहिले न्हवते ती दिवसेंदिवस रोहन मध्ये गुंतत चालली होती. मनाला तिच्या तिला आवर घालता येत न्हवता. रोहन स्मार्ट होता तितकाच स्वार्थी ही होता पण श्रुतीला कशाचेच भान राहिले न्हवते. अलीकडे ती खूप खुश आणि आनंदी असायची प्रशांत ही तिच्यातला हा बदल जाणवला बट नेहमी प्रमाणे तो तिला गृहीत धरून असायचा की छान आहे ना श्रुती जर अशी हसत आनंदात राहत असेल तर !त्याचा पूर्ण विश्वास होता तिच्यावर. आज प्रशांत घरी आला तेव्हा जरा टेंन्स दिसत होता. हे श्रुतीला जाणवले तिने त्याला विचारले काय झाले प्रशांत असा अपसेट का दिसतो आहेस? तो म्हणाला, चहा दे मग आपण बोलू चहा घेत .तिने दोघां चा चहा बनवला आणि प्रशांत फ्रेश होऊन आला. श्रुती म्हणाली बोल काय झाले आहे? श्रुती माझा मित्र अजय तुला माहीत आहे ना ? हा त्याचे काय तिने विचारले. अजय त्याच्या बायकोला डिओर्स देणार आहे. का काय झाले असे अचानक की एकदम डिओर्स? अजय च्या बायको चे बाहेर अफेयर सुरू आहे ग एका बरोबर. ओहह पण त्याला पूर्ण खात्री आहे का प्रशांत की नुसता संशय आहे. पूर्ण खात्री आहे त्याला रादर त्याने दोघांना एकत्र पाहिले आहे आणि व्हाटस अँप चॅट बघितले आहेत. खूप भांडण झाले आहे त्यांच ,त्यामुळे तो तिला आता डिओर्स देणार आहे कोणाला पटेल ग हे असे वागणे,अजय चा किती विश्वास होता बायको वर आणि तिने त्याचा विश्वासघात केला ,अजय ने काही ही कमी केले नाही तिला,नोकरी करू दिली पूर्ण स्वातंत्र्य दिले,याचा तिने गैरफायदा घेतला. कसे असते ना श्रुती आपल्या मनावर आपला कंट्रोल हवा,कोणी जरा गोड बोलल किंवा आपलं कौतुक केले की लगेच आपण त्या व्यक्तीला भुलून जाऊ नये आपण काय आहोत काय करतो आहोत ,कोणाची तरी बायको आहोत आपल्यावर घरची जबाबदारी आहे हे नवरा आणि बायको दोघांनी विसरता कामा नये. एकमेकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये. आपलं मन नाठाळ असत ग ,क्षणिक सुखाच्या मागे ते धावत असत. आपल्या कडे जे नाही तेच आपल्या मनाला हवे असते पण माणूस हे विसरतो की आपल्या कडे जे आहे ते सुंदरच आहे आपणच त्याची किंमत केली पाहिजे कदर केली पाहिजे. तुला काय वाटत श्रुती ? प्रशांत ने विचारले. ती त्याच्या बोलण्याचा विचारात मग्न होती. प्रशांत ने तिला हलवून विचारले कसला विचार करतेस इतका? ती म्हणाली, नाही काही पण तुला पटले का अजय चे म्हणजे तू जर अजय च्या जागी असतास तर तू ही मला डिओर्स दिला असतास का? प्रशांत ने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,एक तर माझा तुझ्या वर पूर्ण विश्वास आहे आणि तू कधी ही चुकीचे वागणार नाहीस याची मला खात्री आहे,..हो ना ? हु.. इतकंच ती म्हणाली . रात्री च्या स्वयंपाकाची ती तयारी करू लागली,पण मनातून प्रशांतचे बोलणे काही केल्या जात न्हवते. रात्री तिला नीट झोप लागली नाही रात्रीभर ती आपल्या वागण्याचा विचार करत राहिली. आपण प्रशांत सारख्या चांगल्या नवऱ्याला फसवत आहोत ही भावना तीच मन पोखरत राहिली. उद्या जर प्रशांत ला माझे आणि रोहन चे जे चालय ते समजले तर?? किती मोठा धक्का बसेल त्याला . मला ही प्रशांत ने डिओर्स दिला तर मी एकटी कशी जगणार आणि तो रोहन मला का स्वीकारले ,तेही समीर सोबत ? नाही मी चुकीचे वागत आहे आता पर्यंत ही गोष्ट बाहेर कोणाला म्हणजे ऑफिस मध्ये सुद्धा नाही समजली तेव्हा आताच आपण यातून बाहेर पडायला हवं,खूप पुढे वाहवत जाण्या पेक्षा आता थांबणं महत्वाचं आहे. असा विचार करत ती झोपी गेली. काल संध्याकाळ पासून तिने मोबाईल पहिला ही न्हवता सो सकाळी उठल्या वर तिने फोन बघितला तर रोहन चे 25 मेसेज आले होते. त्यात तू रिप्लाय का करत नाहीयेस,काय झाले डियर ,एनी प्रॉब्लेम,आय मिस यु यार असे खूप मेसेज होते. श्रुती ने त्याला मेसेज केला काही झाले नाही रोहन पण आता मी तुझ्या शी कोणत्या ही प्रकारचा संबंध ठेवणार नाही आपण एकत्र काम करतो तर तेवढच ठीक आहे मला जास्त तुझ्याशी बोलण्यात आणि मैत्री ठेवण्यात इंटरेस्ट नाही. सो तू मला मेसेज किंवा कॉल करू नकोस . तसा रोहन चा रिप्लाय आला अग असे का बोलतेस माझे काही चुकले का ? श्रुती ने मेसेज केला रोहन मला काही ही बोलायचे नाही तू मला कॉन्टॅक्ट करू नकोस ओके . असे म्हणत तिने त्याचा नंबर ब्लॉक केला. आणि प्रसन्न मनाने तिचे काम आवरू लागली. तिचे आयुष्य प्रशांत आणि समीर मूळे सुंदर बनले आहे त्याला ती कीड लागू देणार न्हवती. क्षणिक भौतिक आकर्षणा पायी तीचे मन बेलगाम झाले होते,त्या मनाला आवर घालणे आणि भरकटू न देने हे आपल्याच हातात असते श्रुती वेळीच सावरली होती आणि मनाला ही तिने सावरले होते. मन ते मन च ते चौफेर उधळणारच पण त्या मनाचा लगाम आपल्या हाती घट्ट पकडून ठेवायला हवा. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात...मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
© sangieta devkar 2017. The copyright rests with the author