Bluepadनभ दाटून आले
Bluepad

नभ दाटून आले

संजय गुरव
संजय गुरव
14th Jun, 2020

Share

निरोप देऊन तुझ्याकडे
धाडलेले पारवे परत आले
एकट्याने मोजलेले क्षणांचे
रांजणही आता भरत आले.

तुझ्या वाटेवर ठेवलेल्या त्या
अल्लड कळीचे फुल झाले.
तुझा आठव एकांतात कसा
आजही कसलीशी भूल घाले.

ओघळलेल्या एकाच अश्रुचे
गोठून मोतीया मोल झाले
कोरड्या काळजात गूढ ते
गुपित अजूनच खोल झाले.

सायंकाळी कवितेचे कडवे एक
शून्यात तुला का भेटून आले..?
अवकाळी माथ्यावर पुन्हा तेच
निळे-सावळे नभही दाटून आले.

10 

Share


संजय गुरव
Written by
संजय गुरव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad