Bluepad | Bluepad
Bluepad
पाणी
Hemant Dinkar Sawale
Hemant Dinkar Sawale
14th Jun, 2020

Share

#पाणी...!

पाणी वाहते नदी नाल्यातून
सागर महासागरातून
जमिनीतून वाहते अहोरात्र
तसंच वाहते डोळ्यातूनही आपोआप

पाणी मुळातून, खोडातून, पानांतून झाडभर वाहते अविरत
पाणी प्रसवते त्याला हवं तेव्हा
पाणी उगवते टँकरमधून आणि
वाहते झोपडीतल्या प्रत्येक हंड्यातून

पाण्याला नसतो रंग हे उघड सत्य नाही
कारण वेळ काळ रंग रूप माणूस पाहून
पाणी पण रंग बदलते सोयीस्करपणे
पाणी गढूळ असते चिखलात असताना
आणि तेच पाणी एसीच्या कॅबिनमधे साफ स्वच्छ होऊन जाते

पाणी फुटक्या पत्र्याच्या छिद्रातून टपकते रात्रभर
त्या आवाजा सोबत अॅडजस्ट करून
मी सुद्धा पाणी होऊन जातो आयुष्यभर

पाणी आहे सर्वत्र आणि सर्वदूर
जमिनीत आणि आभाळात
पण मला आजही हक्काचं घोटभर पाणी मिळालं नाही...!

#हेमंत_दिनकर_सावळे
पाणी

7 

Share


Hemant Dinkar Sawale
Written by
Hemant Dinkar Sawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad