Bluepad | Bluepad
Bluepad
भूल भुलैया २ चित्रपट समीक्षण
Prathmesh kate
Prathmesh kate
24th Jun, 2022

Share

दिग्दर्शक :- अनीस बझ्मी
मुख्य कलाकार :- कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू
Released On :- २० मे २०२२
•••••
मला हॉरर, मिस्ट्री, कॉमेडी चित्रपटांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे मागील महिन्यात रिलीज झालेल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. शेवटी तो आता बघितला.
• कथानक :-
पहिल्याच सीनमध्ये ठाकुरांच्या हवेलीतील सदस्यांच्या जीवावर उठलेली दुष्ट चेटकी मंजुलिका हिला एका मांत्रिकाच्या मदतीने एका खोलीत कैद करून, ती खोली कायमची बंद करण्यात आली असल्याचं पाहायला मिळते.
मग १८ वर्षांनंतर कथा पुढे Continue होते. रीत राठोड ( कियारा अडवाणी ) चंदीगढला आपल्या घरी लग्नासाठी निघाली असताना रूहान रंधावा ( कार्तिक आर्यन ) नामक तिथे फिरण्यासाठी आलेल्या आणि आता परत जायला निघालेल्या तरूणाशी तिची ओळख होते. त्याच्यासोबत रीत तिथल्या म्युझिक फेस्टिवल साठी थांबते. त्याच रात्री दुसऱ्या बसने जाण्यापूर्वी रीत हिला आपली बहीण आणि Fioncee च्या अफेयर बद्दल समजते. बहिणीसाठी रीत घरी परत न जाता, काही काळ भवानीगढ इथल्या आपल्या हवेलीत जाऊन राहण्याचं ठरवते. तिच्या विनंतीवरून रूहान तिच्यासोबत भवानीगढला जातो. इथून कथा भितीदायक आणि उत्कंठावर्धक वळणे घेत जाते.
कथानक पहिल्या भागाइतके उत्तम किंवा नाविन्यपूर्ण, युनिक नसले तरी ठिकठाक आहे. दिग्दर्शन चांगलं वाटलं. संवाद फारसे उल्लेखनीय वाटले नाही. लक्षात राहण्यासारखा एकही डायलॉग नाही. उलट काही ठिकाणी असे संवाद का, असा प्रश्न पडतो.
कार्तिक आर्यनने उत्तम अभिनय केला आहे. काही ठिकाणी त्याचे संवाद बोलणे नाटकी वाटते. त्याचं हसणं ( अक्षयकुमार ची कॉपीच ) आणि हसत बोललेले डायलॉग्ज कृत्रिम, पकाऊ वाटतात. पती पत्नी और वो सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसारखा impact आला नाही. काही ठिकाणी मात्र त्याची बोलण्याची स्टाईल आणि बॉडी लँग्वेज मुळेच संवाद आधिक Funny वाटतात. समर्थ चौहान या बाल कलाकारासोबतचे त्याचे सीन्स खळखळून हसवतात. शेवटी तर त्याने अक्षरशः कमाल केली आहे. चित्रपटात अधून मधून त्याच्या पात्राचे सिरीयस अथवा भावनिक रूप दाखवले असते तर त्याचा अभिनय जास्त भावला असता.
कियारा अडवाणीने एका स्मार्ट आणि बिनधास्त तरूणीचे पात्र चांगले निभावले आहे. ती एक टॅलेंटेड अभिनेत्री आहे ; पण तिच्या भूमिकेला फारसा वाव मिळालेला नाही. ' मेरे ढोलना ' या गाण्यावर डान्स करतानाचा तिचा अभिनय, बॉडी लँग्वेज वाखाणण्याजोगे आहे. इथे तिने आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटात सर्वाधिक उल्लेखनीय आणि कौतुकास्पद अभिनय केला आहे ' तब्बू ' हिने. सुरुवातीस केवळ एका साधारण सहभूमिकेत असल्यासारख्या वाटणाऱ्या तब्बूचे मध्यंतरानंतर अत्यंत वेगळे व आधिपेक्षा पूर्ण विसंगत रूप पाहायला मिळते. त्यांच्या अभिनयातील दोन निरनिराळे शेड्स अनुभवायला मिळतात.
चित्रपटातील महत्वपूर्ण भाग म्हणजे विनोदाची बाजू सांभाळली आहे, राजपाल यादव आणि संजय मिश्रा, आश्विनी काळसेकर यांनी. इतर सहकलाकारांनीही आपल्या भूमिका नीट पार पाडल्या आहेत.
• अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचा Genere. हा एक हॉरर - कॉमेडी चित्रपट आहे. शेवटी एक मोठा सस्पेनही आहे.
Horror element - मध्यंतरापर्यंत विशेष भीतीदायक काही घडत नाही. Evil Spirit ची एन्ट्री निराश करते. त्यानंतरचे तीन चार सीन्स नक्कीच खिळवून ठेवणारे वाटले.‌ हॉरर चित्रपटात कॉमेडी ठिक आहे ; मात्र चक्क मृतात्म्यासोबत केलेली कॉमेडी पचतही नाही आणि पटतही नाही. Evil Spirit वारंवार समोर न आणता अधिक भीतीदायकता आणण्याचा प्रयत्न करायला हवा होता.
कॉमेडीबाबत बोलायचं झाल्यास भूल भुलैय्या १ मधील छोटा पंडित या पात्राची सर नसली तरी राजपाल यादवांचे पात्र मजेदार आहे. संजय मिश्रा यांचे पात्र जरा नाटकी वाटते. विनोद बरेचसे एकसारखे आहेत‌. तरी त्यांच्या खास शैलीत बोललेले संवाद ऐकताना गंमतीशीर वाटतात. कार्तिक आर्यन, अश्विनी काळसेकर आणि बालकलाकार समर्थ चौहान यांनीही त्यांना कॉमेडीत उत्तम साथ दिली आहे.
चित्रपटातील सस्पेन्स तर एका चित्रपटाची अक्षरशः कॉपीच आहे ; पण तो शेवटपर्यंत व्यवस्थित राखून ठेवण्यात यश आल्याने थक्क करतो.
• चित्रपटात ' आमी जे तोमार ' आणि ' हरे कृष्णा हरे राम ' ही पहिल्या भागातील पॉप्युलर झालेली गाणी Recreat केली आहेत. शिवाय २ नव्या गाण्यांचा समावेश केला आहे.
पैकी ' हरे कृष्ण हरे राम ' हे गाणे छान वाटले.
' मेरे ढोलना सुन ' ( आमी जे तोमार ) हे माझे अतिशय आवडते गीत. चित्रपटात हे गाणं सारखं सारखं दाखवले असल्याने कंटाळा वाटू शकतो.
' श्रेया घोषाल ' या मूळ गायिकेशिवाय अरिजित सिंग आणि तुषार जोशी यांनी वेगवेगळ्या Male versions मध्ये गायले आहे. rock version मध्येही गायले गेले आहे. मला Personally अरिजित सिंगचे Version आधिक भावले. चित्रपटापेक्षाही अरिजितच्या Version ची मूळ गाण्याशी तुलना केली जाऊ नये असं मनापासून वाटतं. श्रेया घोषालने आपल्या सुमधुर आवाजात हे सुंदर गाणे स्मरणीय बनवले आहेच. तसेच अरिजित सिंगने गायलेले ही नक्कीच श्रवणीय आणि हृदयस्पर्शी आहे.
नव्या गाण्यांपैकी अरिजित सिंगचेच ' हम नशें मे तो नही ' हेही छानसे रोमॅंटिक सॉंग आहे. ' दे ताली ' हे पार्टी सॉंग उगाचच वाटले
कथानकाची पार्श्वभूमी पहिल्या भागापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे भूल भुलैय्या चित्रपटाचा सिक्वेल म्हणून करण्याऐवजी वेगळा चित्रपट म्हणून सादर करता आला असता. चित्रपट चांगला असल्यामुळे तसं केलं असतं तर जितका यशस्वी ठरलाय त्यापेक्षा जास्त यशस्वी ठरू शकला असता.
•••••
* उणिवा :-
१. संजय मिश्रा, कियारा अडवाणी यांसारख्या कलाकारांचा योग्य वापर केला गेला नाही.
२. संवाद तितकेसे जमलेले नाहीत.
३. आधिक भीतीदायक बनवता आला असता.
४. ' मेरे ढोलना ' या गीताचा अति वापर. रॉक व्हर्जन खास आवडले नाही. नव्या दोन गाण्यांपैकी ' दे ताली ' काही पटले नाही.
५. सस्पेन्सच दाखवायचा होता तर वेगळे काही करता आले असते का असं मनात येतं.
* वैशिष्ट्ये :-
१. कथानक कुठेही भटकल्यासारखे वाटत नाही.
२. दिग्दर्शन चांगले आहे.
३. तब्बू आणि कार्तिक आर्यनचा उत्तम अभिनय. सहकलाकारांची चांगली साथ.
४. कॉमेडी बऱ्यापैकी आहे. मध्यंतरानंतर काही हॉरर सीन्स खिळवून ठेवणारे आहेत. सस्पेन्स शेवटपर्यंत चालाखीने राखून ठेवण्यात आले आहे.
५. पहिल्या भागातील गाण्यांचे Recreation छान जमले आहे. ' मेरे ढोलना ' चे Rock version सोडता. नव्या गाण्यांपैकी ' हम नशे मैं..' हे गाणेही सुरेख आहे.
६. क्लायमॅक्स उत्तमरीत्या पार पाडला आहे.
•••••
एकूण हॉरर - कॉमेडीचा मेळ अजून प्रभावीपणे साधता आला असता. अर्थात हे मिश्रण अगदीच फसलं आहे असही नाही. चित्रपट One time watchable नक्कीच आहे. नेटफ्लिक्सवर नुकताच उपलब्ध झाला आहे.
माझे रेटिंग्स - ६.५ / १०
@ प्रथमेश काटे
मराठी कथा आणि लेख
https://www.facebook.com/groups/758165158061766/?ref=share_group_link

167 

Share


Prathmesh kate
Written by
Prathmesh kate

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad