लेखक :- एकनाथ बडवाईक
दिनांक :-२४/०६/२०२२
चाय हे एक उत्तेजक पेय आहे. आपल्या देशातील डोंगराळ प्रदेशात चहाचे मळे आढळतात. चाय ही हिरविगार झुडूप वर्गीय वनस्पती आहे.
चायच्या वनस्पतींच्या पानांपासून चाय पावडर तयार केले जाते. कपभर चाय तयार करण्यासाठी कपभर पाण्यात अर्धा चमचा चाय पावडर घालून त्यात चवीनुसार साखर आणि दुध घालून उकळून घेतले जाते. उकळून घेतल्यानंतर चायचा अर्क दुध मिश्रीत पाण्यात एकजीव होऊन चाय तयार होते .ती चाय पिण्यासाठी सर्व्ह केली जाते.
चाय तयार करताना पाणी दुध साखर आणि चाय पावडर या व्यतिरिक्त अद्रक , दळद , काजू ,बदाम , यांसारखे विविध पदार्थ मिसळून वेगवेगळ्या प्रकारची चाय तयार केली जाते. उदा. आसाम चाय , बदाम चाय ,अद्रकवाली चाय , निलगिरी चाय.
आपला देश कृषीप्रधान देश आहे.आपल्या देशातील विविध राज्यामधे विविध प्रकारची पिके घेतली जातात.