Bluepad | Bluepad
Bluepad
आणि कागद हसले.........😘😘
anjali bhalshankar
anjali bhalshankar
24th Jun, 2022

Share

स्वप्न अर्धवट सोडू नका ती जिद्दीने पुर्ण करा.
स्पर्धेसाठी लेखन.
आणि कागद हसले.........😘😘
दिनांक 21/6/2022 रोजच्या सारखाच विशेष असं काहीही नव्हत आज.नैसर्गिक बाब म्हणजे वर्षातील इतर दिवसाच्या मानाने आजचा दिवस मोठ्ठा होता.काल ठरल्याप्रमाणे बहिणीच्या मुलीला महाविद्यालयिन प्रवेशाची विचारणा करायला कर्वे रस्त्यावरील नामांकित कॉलेजमध्ये गेलो.प्रशस्त अशा फाटकातुन प्रवेश करता क्षणी युवा भारत समोर ऊभा दिसला जिकडे तिकडे महाविद्यालयिन तरूण तरुणींचे घोळके.न जाणो कोणकोणत्या गाव वा शहरातुन या ऑक्सफर्ड ऑफ वेस्टर्न म्हणुन ओळखल्या जाणार्या विद्येच्या माहेरघरी भविष्य उज्वल करायला येतात !रमतात! स्वप्न पाहतात. कष्ट व जिद्द बाळगून निश्चयाने वाटचाल करतात ध्येय निश्चित करतात.मग प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवनात यशस्वी होतात.बापरे!! इतके सारे विचार निमिषार्धात मनात येऊन गेले माझ्या.मी माझ्याच भुतकाळात गेले जणु!! अग माऊ या जिन्याने जायचय आपल्याला!!श्रेयाच्या म्हणजे माझ्या भाचीच्या आवाजाने भानावर येऊन तरुण मुलामुलींच्या विचारात मग्न होऊन त्यांच्या घोळक्याकडे नकळत वळलेली पावले पहील्या मजल्यावरील प्रवेश विभागाकडे वळवली.तेथील प्रवेश प्रक्रीया व इतर माहीती घेऊन.आम्ही निघालो.मात्र गेली कित्येक दिवस मनाच्या आतल्या कोपऱ्यात दडवुन ठेवलेला विचार सहजच बाहेर आला नि मुलीच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या शंका व माहिती विचारताना सहज प्रश्न केला काय हो लाॅ आहे का येथे?मघापासुन रजिस्टर मध्ये पहात खाली मानेनेच आपले काम करीत आमच्या प्रश्नांचे निरसन करीत असलेल्या व्यक्तीने !! आता वर पाहण्याची तसदी घेतली व माझ्याकडे असे काही पाहीले की तिथेच माझ्या उत्साहावर विरजन पडले.तरीही त्याच्या कोणाला करायचेय लाॅ?या प्रश्नावर मी जरा जास्तच आत्मविश्वासाने मला असे ऊत्तर दिले.नाही!! आमच्या कडे लाॅ नाही.श्रेयानेही माझ्याकडे पाहीले प्रश्न, आश्चर्य वा आश्चर्य मिश्रित प्रश्नाने?मात्र ती खोदुन मला विचारनार नाही हे माहीत असल्याने मीच ऊत्तर दिले अग घाबरू नको!! तु तुझ्या मर्जीचेच शिक्षण पुढे सुरू ठेव मी खरच !!माझ्यासाठीच विचारले होते.काय?चकीत होऊन खरचं माऊ तु लाॅ करणार आहेस का?मग मला नको हे कॉलेज आपण दोघी एकाच कॉलेज मध्ये जाऊ जिकडे तु प्रवेश घेशिल तिकडेच माझी शाखा आहे का पाहुन माझेही अडमिशन करूया तिथे.असे म्हणुन तिने तीन चार कॉलेज ची नावे ही सांगितली.अग!!थांब अजुन कशात काहीच नाही फकत विचार आला सहज बोलुन गेले खुप किचकट आहे ग!प्रक्रीया त्यात शिक्षण सोडुन सतरा अठरा वर्षांचा काळ लोटलाय!शक्य होइल का ग!अभ्यास !अवघड असेल!काही नाही होईल सार तु हुषार आहे !!!हा त्या बापुडीचा गैरसमज बर का!मग काय त्यातली त्यात घराजवळील दोनतीन कॉलेज मध्ये फिरलो चौकशा करीत. सहसा!!आया लेकीसाठी शाळा कॉलेज ची दार झिजवतात.इथ उलट सुरू होत माझी लेक ((माय मरो नी मावशी जगो हा आपल्या खेड्यातल्या म्हणीला अनुसरून ))माझ्या लाॅ प्रवेशाच्या चौकशीसाठी फिरत होती.लाॅ करायचे तर आधी सीइटी(( महाराष्ट्र काॅमन एंट्रन्स टेस्ट ))द्यावी लागते.आणि हो ऊद्या शेवटची तारीख आहे आजच भरा सीइटी चा फार्म असे ही एक जण म्हणाले.ही उत्तर मिळाली आणि सोबत चांगला विचार आहे!!शिक्षणाला वय नसत!!जरूर करा!!जिद्द हवी!! वगैरे अशादायक कमेंट सुद्धा आल्या.खरंतर काही वेळापूर्वी पोरीसाठी गेलेल्या कॉलेजात त्या व्यक्तीने टाकलेला कटाक्ष व त्यामुळे आलेली निराषा लोप पावली व श्रेयाला घेऊन पहील घर गाठलं........कित्येक वर्ष घरात कोणत्यातरी जीर्ण फायली मध्ये लक्तर होऊन पडलेली शैक्षणिक कागदपत्र कीतीतरी वेळाने सापडली एकदाची.तशीच पुरचुंडी ऊचलुन अप्पा बळवंत चौक सध्याचे ए.बी. सी.गाठले ऑनलाईन फार्म भरून कुठे देतात ते शोधलं.माझा नी त्या कागदपत्रांचा अवतार पाहुनच समोरील व्यक्तिने पन्नास रूपयाच्या, खरं तर घरी बसुन मोबाईल वर फुकटात!!कामासाठी दोनशे रूपये आकारले.जीर्ण झालेले सर्टीफिकेट व्यवस्थित स्कॅन करून फार्म व फि ऑनलाईन भरून रीतसर रीसीट ची कॉपी माझ्या हाती ठेवत म्हणाला महिनाभराचा वेळ आहे अभ्यासाला.बापरे !कसे करायचे ग! श्रेया आता. काही नाही चल! होइल सार. अगोदर ही सारी सर्टीफिकेट लॅमिनेट करून घेऊया. जवळपास सतरा सर्टीफिकेट निघाली सतरा अठरा वर्षा पुर्वी फडताळात ठेवलेली इतकी कागद होती तर?ज्या कागदांच्या बळावर काही मिनिटात मी नव्या पिढीच्या बरोबरीने परीक्षा देऊ शकत होते.व पुढे एक अवघड पंरतु स्वताला सिद्ध करण्याचा चोखंदळ मार्ग या पौढ वयातही निवडणयाचे स्वप्न पहाण्याची क्षमता ठेऊ शकत होते.उगाचच वाटल!काही क्षण त्या कागद पत्रांना ऊराशी धरून कुरवाळवं जी आता लॅमिनेट केलेल्या नव्याकोऱ्या प्लास्टीक मधून जणु माझ्याकडे पाहुन हरकुन हसत मला धन्यवाद देत होती त्यांना त्यांची किंमत समजाऊन दिली म्हणुन म्हणा कींवा कितीतरी मोठ्या कालावधी नंतर का होइना मला त्यांची किंमत समजली म्हणुन.आता मात्र ती पुढच्या सर्व सोपस्कार टप्पा पार करे पर्यंत माझ्या सोबत रहातील छानशा निळ्याशार फोल्डर मध्ये.समोरच्या कपाटात अगदी नजरेच्या टप्प्यात!!अंजली भालशंकर पाऊस वेचताना.काव्यसंग्रह माध्यान्ह.

247 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad