चहा ची चाहत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.हे वाक्य तर आता आपल्याला पाठ झालाय की चहा प्यायला कुठलीही वेळ लागत नाही,पणं वेळेला चहा मात्र लागतोच.बाहेर पाऊस असेल तर डोळ्यासमोर पेपर आणि हातात गरमागरम चहाचा कप हवाच. बरोबरीला संगीत असेल तर स्वर्ग सुखच.
दुधाचे दात पडले की पुढे काहीवर्ष दुध बोर्नव्हिटा पिणार मुल नकळत कधी चहा प्यायला लागत हे लक्षातही येत नाही.आणि मुल मोठ झाल याची जाणीव होते.
मनाला आणि शरीराला ताजतवान करणारा हा चहा म्हणजे कॅमेलिया सिनेंसिस वनस्पतीच्या पानांची भुकटी आणि पाणी किंवा दुध यांच्या मिश्रणाने बनलेल्या पेय.याचे मूळ नाव चिनी भाषेत छा असे आहे त्याचे उच्चारण बदलत चा,चाय,चहा,टी असे होत गेले.जगात सर्व देशात पेयां मध्ये पाण्या खालोखाल चहाचा दुसरा नंबर लागतो.सर्व देशात हा चहा वेगवेगळ्या स्वरुपात पिला जातो.आपल्याकडे आसाम सारख्या भागात विशेष करून दार्जिलिंग व जवळपास चहाचे मळे आढळून येतात.
आपल्या महाराष्ट्रात तर चहा हा आता संस्कृतीचा भाग झाला आहे असे म्हंटले तरी चालेल.कारण विद्यार्थी दशेत नवीन मित्र बनवणे,एकमेकात भांडण,रुसवे मिटवणे, कुठलाही आनंद एकत्र सेलिब्रेट करणे,रात्री जागरण करून अभयस करण,या गोष्टी चहा शिवाय अधुऱ्या असतात.पूर्वी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडून पसंती येणं म्हणजे एका चहाच्या कपावर फिदा होऊन आउष्य भराच बंधनात रहाणं अस म्हणल तर अतिशयोक्ती नाही.
लहानपणी मझ्या पहाण्यात मराठवाड्यात तर घरी कोणी अनोळखी व्यक्ति आली तरी चहा दिला जायचा,कधीकधी पोस्टमन,सिलेंडर वाले, दही लोणी विकायला येणाऱ्या बायका,यांना आवर्जून चहा दिला जायचा. कधीकधी कोणी हक्काने चहा करायला सांगायचं.कुणाच्या घरात दुःखद प्रसंग आला तर सारी निरवानिरव झाली की कुणी शेजारी अगदी आपुलकीने सगळ्यांसाठी चहा आणत तेवढच सर्वांना थोड आधाराला,रिलॅक्स व्हायला पुरेस असायचं.
व्यवसायिक जगतात ,राजकीय वर्तुळात कुठल्याहि चर्चा,आपसातले वादविवाद,यातून वातावरणात आलेला ताण एका चहाच्या कपाने हलका होतो.चहाच्या पेल्यातील वादळ तिथपूरतच मर्यादित राहून सकारात्मक तोडगा निघु शकतो.
या चहाला कुठलीही गोष्ट वर्ज्य नाही अगदी गरिबाच्या झोपडीत जेव्हड्या आत्मीयतेने बनतो.तेवढ्याच आत्मीयतेने संसद भवनात पीला जातो.विशेष म्हणजे.अगदी मातीच्या कुल्ल्हरीत ते लाओपालाच्या कपात तेवढ्याच दिमाखाने मिरवतो.
एक कल्पना केली तर आपल्या देशाचं नेतृत्व करणार व्यक्तिमत्व म्हणजे एक अस्सल चायवालाय अस म्हणावे लागेल.कारण चहाच्या घटक पदार्थांची वैशिष्टय म्हणजे चहा पावडरचा कडवट पणा,दुधाची स्निग्धता म्हणजे प्रेमळपणा, साख्ररेचा गोडवा,पाण्याची कुठल्याहि रंगात समावण्याची वृत्ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीला स्विकरण,या साऱ्या गुणांना एकहाती एकजूट करण हे कौशल्य चहा वाल्यकडे असत.
त्याच प्रमाणे आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आदरणीय व्यक्तिमत्व चहातल्या घटकां सारखी वैशिष्ट्य अंगिकारून त्या त्या परिस्थितीत कठोर,प्रेमळ, सर्वसमावेशक सहिष्णूतेने इतर राष्ट्रात आपल्या देशाचा गौरव वाढवत आहेत.
आजकाल ओरिजनल चहाशी स्पर्धा करणारे प्रकर खूप आले आहेत
ग्रीन टी,ब्लॅक टी,हर्बल टी, गुळाचा चहा बासुंदी चहा पणं मला वाटत सर्वाचा ऑल टाईम फेवरेट चहा म्हणजे आल घालून केलेला ओरिजनल चहा.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो म्हणजे व्यसन झालेल चहापान आरोग्याला घतक ठरू शकत.
अशी ही चहाची चर्चा थंबवताना म्हणावस वाटत..
एक चाय की प्याली
यु तो मिल जाती है हर नुक्कड पर आसानिसे!
पिनेका तभी है मजा,कोई पूछे अगर दिलंसे!
पूजा तुळशीबागवाले.