Bluepad | Bluepad
Bluepad
पाऊस नि चहा
सौ.संगिता सहारे
24th Jun, 2022

Share

चहाच्या प्रेमात कित्येकजण असतात कारण चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाचं ....चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी हवाच असतो..
🌪🌪🌪त्यात पावसाच्या सरी वरून मेघाची गर्जना सोबतच आकाशातून बरसणा-या जलधारा पृथ्वीला सजवण्यासाठी उतरत असतात तर मानवी मनाला आनंदी क्षणी आठवणी ताज्या करणा-या गरमागरम चहा मग अदरकाचा असो की विलायची पुड सोबतीने सजलेला सिजलेला वाफाळणारा चहा पावसाच्या सरीसोबत एक कप चहा गरमागरम कांदी भज्जी सोबत लागतोच .....कधी प्रेयसी बरोबरचा तर जोडीदार च्या सोबतीचा.... तर सोबतच मैत्री म्हटले की चहा आलाच की कीतीही अनोळखी असले तरी पहीली पाहूणेची ओळख असेल दुरचे असले तरीही चहाची सर चहाच करते ओळख निर्माण करण्यासाठी असेही हक्काने बोलवतील....
म्हणतात ना चहाच्या प्रेमात कित्येकजण असतात कारण चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाचं... सकाळची सुरूवात असो की संध्याकाळच्या ताजेपणाला नेहमीच बर का लागतो फक्त चहा कित्येक चर्चा ह्या एक चहाने रंगतात बहरतात गंप्पा संपवायच नाव घेत नाही चहा त्यात श्रीमंत असो की गरीब एक चहाने माणुसकी दाखविते एकमेकांच्या मनात आपुलकी निर्माण करते..
पाऊसाच्या सरीत कधी असेल कामाचे टेन्शन फक्त आळस झटकायला चहा... आनंद क्षण तयार करायला पुरेसा असतो बर का..हा प्रत्येक नात्यात आदर भाव जोडण्याच काम करतो कुणी काॅफी पीतो पण चहाचे दिवाने टक्केवारीत जास्त सापडेल ही पण चहा शिवाय पाऊस काय बरसणा-या सरीही अधुरीच की......☕
सौ.संगिता सहारे .....✍
पाऊस नि चहा

178 

Share


Written by
सौ.संगिता सहारे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad