"आत्मा असतो की नाही?..." हा भयंकर प्रश्न तुमच्यासहित मलाही गेले अनेक दिवस पडला आहे.
विविध धर्मग्रंथात आत्म्याचे दाखले देण्यात आले आहे शिवाय आत्म्या अमर असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आपण आधुनिक शारीरिक विज्ञानावर विश्वास ठेवतो कारण ते एक सिद्ध शास्त्र आहे.
परंतु,ह्या सिद्ध शास्त्राने आपल्या हजारो वर्षांच्या धर्मग्रंथाना आव्हान दिल्यासारखे वाटत आहे.
त्याचे कारण असे की,
ग्रेट ब्रिटनमधील एका तेरा वर्षांच्या मुलीने एका दुर्धर आजारादरम्यान तिच्यावर उपचार चालू असताना जगाने अवाक व्हावे अशी विनंती केली...
ती अशी की,"आजच्या प्रचंड पुढारलेल्या प्रगतीचे प्रत्येक आयाम स्पर्शलेल्या जगाने व शरीर विज्ञानाने माझ्या पहिल्या मृत्यूनंतर मला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न करू नयेत.
मी जरी तेरा वर्षांची असले तरी पुढे जगण्यात आता मला बिलकुल स्वारस्य नाही."
वरील प्रश्नाने साऱ्यांनाच बुचकळ्यात पाडत आत्म्याच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले.
आजच्या विज्ञानाने यापुढेही जात अजून प्रगती केली आणि बंद पडले शरीर पुन्हा चालते-बोलते किंवा जिवंत केले तर हा आविष्कार आत्म्याच्या अस्तित्वावावर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उभे करेल असे बऱ्याच तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वरील प्रश्नाबाबत तुम्हाला काय वाटते हे अभिप्राय देऊन जरूर कळवा.