बरीच जन मला विचारतात की तुमचे शिक्षण किती झाले? मी त्यांच्याकडे विस्मयाने बघतो, अरे शिक्षण म्हणजे काय? चार बुकं वाचली अन् त्याच बुकातल्या प्रश्नांची उत्तरे दिली? थोडक्यात मी ती पाठांतर केली अभ्यास केला लक्षात ठेवली अन् पास झालो सरकारी दप्तरी नोंद झाली बस्स...काही लोकं म्हणतील असं कुठं असतं का? शिक्षण शिक्षणच असतं...
शिक्षीत लोकांना मी अशिक्षितांसारखं वागतांना बघीतलय अन अनुभवलं सुद्धा...
१)मी अमिताभ बच्चनचा खुद्दार सिनेमा बघीतला होता त्यात बच्चन ने एका जबाबदार भावाची भुमिका निभावली होती, स्वतः शिक्षण न घेता आल्याने लहान भावाच्या शिक्षणासाठी धडपड करतो.
-मी जर त्याच्याकडुन 'खुद्दारी शिकलो तर याला शिक्षण म्हणु शकत नाही का?
२)तसेच दुसरे उदाहरण घेवु 'याराना' सिनेमा बघीतला त्यात अमिताभला त्याचा मित्र अमजद खान स्वतः बर्बाद होतो अन मित्राला मदत करुन त्याचे टॅलेंट त्याला सांगुन त्याला खुप यशस्वी गायक बनवतो.
-जर मी अमजद खान च्या भुमीकेतुन जर मित्र कसा असावा हे शिकलो तर याला शिक्षण म्हणु शकत नाही का?
३)तसेच मी 'सदमा' सिनेमा बघीतला त्यातुन कमल हसन ने एका वेड्या मुलीला श्रीदेवी ला खुप खुप जीव लावुन स्वतः यातना सहन करुन तिचे संगोपन केले नंतर तीला अनेक प्रकारच्या करामती दाखवुन तीचे मनोरंजन करतो व तिला मानसिक रित्या पुर्ववत बरे करतो, तरी ती त्याला विसरते.
-जर मी कमल हसन कडुन प्रेरणा घेऊन जर एखाद्या वेड्या मुलीवर निष्पाप दया करायची तयारी ठेवुन तशा ह्रदयाची तयारी ठेवतो. तर हे ही एक शिक्षणच शिकलो याला शिक्षण म्हणता येणार नाही का?
४)अशा अनेक प्रकारच्या सिनेमांतील बहीणीचे रक्षण करणारा भाऊ कसा असावा? बाप कसा असावा? आई बापाला श्रावण बाळा सारखा सांभाळ करणारा आदर्श मुलगा कसा असावा? एक जीवाला जीव देणारा मित्र कसा असावा?एक देशासाठी प्राणाची आहुती देणारा जवान कसा असावा? एक संसारिक प्रपंचावर प्रेम असणारा पति कसा असावा ?
हे जर शिकुण घेतले तर याला शिक्षण म्हणता येणार नाही का? मोठ्या धाट्या वडिलधारी मंडळींचा आदर कसा करावा
हे जर त्यातुन शिकायला मिळाले असेल तर ते शिक्षण म्हणता येत नाही का?
दया क्षमा शांति ह्या गोष्टी आत्मसात केल्या तर ते शिक्षण नव्हे का? खुप मोठा विषय आहे हा जेवढा घेतला तेवढा कमीच आहे, सहज सुचले पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षीक रित्या स्वानुभवलेल्या गोष्टी हा पण एक घेण्या सारखा विषय नाही का?
मी म्हणत नाही की शिक्षणाचा उपयोग नाही पण जे लोकं शिक्षणा पासुन काही कारणास्तव वंचित राहीले, त्यांना जगात वागावे कसे? ह्याची जर जाण असेल तर मला नाही वाटत खोट्या डिगऱ्या खोटे सर्टिफिकेटस ची गरज भासेल?
उच्च शिक्षित असुनही तुमच्या कडे सामाजिक जाण नसेल तर ते शिक्षण शुन्य आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही!
आमच्या घराजवळ एक गतीमंद महेश(बापु) नावाचा मुलगा राह्यचा, तो सकाळी लवकर उठायचा आंघोळ पांघोळ करुन केसांना चपचपीत तेल चोपडुन छान स्वच्छ कपडे घालुन आमचे घरी नित्य नियमाने यायचा.
घरी आल्या आल्या तो सर्वांना मोठ्याने हाका मारुन उठवत असे, मला तर "ऐ झोपाळ्या उठ" ह्या शब्दांत उठवत असे,
हातात खराटा घेऊन अख्खे आंगन झाडुन घेत असे, नंतर घरातील अंथरुन सुद्धा घड्या घालुन निटनेटके ठेवत असे, देवघरातील दिवा पेटवुन देवाची त्याला शाळेत शिकवलेली प्रार्थना मोठ्या आवाजात म्हणत असे, नंतर सर्व आटोपुन तो माझ्याकडे चहा मागत असे.
त्याला कसे कळे की साफ सफाई करुन स्वच्छ कसे रहावे?
इतका कसा हुशार,किती चांगले संस्कार, हे कुठुन आले? अन् तो गतीमंद शाळेत जात असे, तेथे शिकत असे, मग आपण ही चांगल्या शाळेत जातो ना? मग आपणांस ही जाण का नाही? आपण खरोखर शिक्षण घेतो का? घेतो पण मग कोणते?
त्यात चांगल्या विषयाला का महत्व देत नाही ? आपले पुस्तकी ज्ञान सारं काही पालथ्या घड्यावर पाणी तर नाही?
मला कधी कधी हाच विचार पडतो की मीच असा विचार करतो ? अन् का पण ?
समाप्त. (प्रतिक्रिया अपेक्षित)
जितेंद्र दिवे
८३९०५२६४४४