Bluepad | Bluepad
Bluepad
बाळंतपण
M
Minal Magadum
24th Jun, 2022

Share

बाळंतपण म्हणजे एक सुखकर काळ....नवीन जवाबदारी ...नवीन उमेद...नवीन जन्म.
माहेरची हक्काची सुट्टी...आई चा मांडीवर डोकं ठेऊन आराम करायचा काळ... बाळ रडायला लागलं की ' मम्मी बघ ग जरा ' असं हक्काने सांगायचं...
पण मम्मी ची नुसती धावपळ....ती ही नवीन आजी झालेली असते न....ही आजी एकच वेळी आई असते आणि आजी ही असते...तिला दोन्ही नाती तेवढ्याच उत्साहाने सांभाळायच्या असतात...दिवसा मायलेकरांना सांभाळायचं रात्रीचं बाळ रडायला लागली की त्याच्या सेवेत जागं राहायचं...
नवीन आजोबांची पण तीच अवस्था असते...आपल्या लेकीला आणि नातवंडाला काहीही कमी पडू नये या साठी धावपळ चालू असते....बाळ रडायला लागलं की आजोबांची नुसती घालमेल चालू असते....त्यामुळे तहान भूक झोप काहीही नसतं त्यांना...
या सगळ्यात तीन महिने कसे निघून जातात कळत ही नाही...लेकीला आणि नातवांडाला त्यांच्या घरी सोडण्याची वेळ येते...त्यांना ही सवय झालेली असते या गोड त्रासाची...पण आपल्या घरात लेक आणि नातवंडं रमलेली पाहून आनंद ही झालेला असतो...परत ते आपल्या घरात बाळाचं हसू रडू ऐकू यावं म्हणून वाट पहात असतात...
Minu

172 

Share


M
Written by
Minal Magadum

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad