नकारात्मकता दूर करण्यासाठी काही छोट्या गोष्टी करायच्या. छोट्या गोष्टी आहेत पण करायला थोडा वेळ लागेल पण नक्कीच जमते👍👍
👁️🗨️परफेक्ट होण्याचा अट्टाहास सोडा.आपण परफेक्ट होण्यासाठी आपली मानसिक आणि शारीरिक दगदग करून घेऊ नका आणि समोरचा ही परफेक्ट असावा अशी अपेक्षा करू नका. आपला ताण चिंता भीती आणि मुख्य म्हणजे मानसिक अस्वस्थता कमी व्हायला खूप मदत होईल आणि यातूनच नकारात्मकता आपल्यापासून दूर जाईल.
⭕️आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करू शकत नाही हे लक्षात घ्या.आपण आपल्या कृतीकडे लक्ष देऊन आपल्या कृतीवर कंट्रोल ठेवू शकतो,पण दुसरा काय करतो,समोरच्याने कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही आणि त्यावर कंट्रोल ही करू शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण कंट्रोल करायला जायचं नाही कारण त्यातून आपली अस्वस्थता वाढते,ताण वाढतो, आपल्याला चिंता वाटते आणि मुख्य म्हणजे नकारात्मक विचार सुरू होतात.
🔘 स्वतःवर शंका घेऊ नका.आपण जे करू ते चांगलं करणार आहोत.आपण जे करू ते आपण पूर्णपणे लक्ष देऊन करणार आहोत हा विचार करा आणि सकारात्मक विचारांचा वापर करून स्वतःवर शंका घेणं कमी करा, कारण आपण प्रत्येकजण खूप खास असतो.कधी आपले प्रयत्न कमी पडतात तर कधी आपल्याला मार्ग लवकर सापडत नाही किंवा मिळाला तरी तो आपल्यासाठी उपयोगी ठरत नाही अशा काही गोष्टी होतात पण आपल्याला हवे ते नक्की मिळणार असतं,त्यामुळे स्वतःवर शंका घेणं कमी करा.
🔴 प्रत्येकाला किंवा स्वतःलाही जज करू नका.
आपण आहोत तसे आहोत,आपण चुकीच्या गोष्टी सोडून सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींवर भर द्यायचा आहे,त्यामुळे आपण वारंवार स्वतःला जज करु नका.स्वतःच्या प्रत्येक गोष्टीला जज करत बसलं तर नकारात्मकता जास्त वाढते आणि त्याचबरोबर दुसर्याच्या ही प्रत्येक गोष्टीला चूक की बरोबर असंच जज करत गेलं,तर आपल्या मनात नकारात्मकता वाढते.आपण अस्वस्थ होतो,आजूबाजूचं वातावरणही अस्वस्थ होतं त्यामुळेच जज करणे म्हणजे चूक आहे कि बरोबर आहे असा सतत विचार करणं सोडून द्या.कारण चूक किंवा बरोबर असं प्रत्येक गोष्टत असेल असं नाही.त्यामुळे जज करणं कमी करा.
🗨️ सतत तक्रार, कुरकुर करणे आपल्याला टाळायचे आहे.कुरकुर करणे, तक्रार करणे यामुळे नकारात्मकता येते.सतत तक्रारीमुळे कुरकुरीमुळे आपण नकारात्मक तेवरच जास्त लक्ष देतो. सकारात्मकतेकडे हवे तेवढे लक्ष देत नाही. त्यामुळे कुरकुर न करता त्यावर उपाय काय करता येईल याकडे लक्ष दिले तर सकारात्मकता जास्त वाढेल आणि नकारात्मकता कमी होईल.
💥चिंता करू नका. कारण आपण ज्या गोष्टींची चिंता करतो ते तसं होईलच असं नाही आणि चिंता वाटत असेल तर तो प्रश्न ती गोष्ट लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा त्यावर योग्य मार्ग काढा आपल्याला जमत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या किंवा तज्ञांची मदत घ्या आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल आणि आपली चिंता लवकरात लवकर दूर करता येईल कारण चिंता वाटणे स्वाभाविक आहे पण त्या चिंतेत गुंतून पडलं कि त्रास होतो आणि वारंवार फक्त चिंता करणं हे आपल्या मानसिक आरोग्याला फार धोकादायक आहे काही काळापुरती वाटणारी चिंता ही असू शकते पण ती जास्त प्रमाणात होत असेल तर वेळीच सावध व्हा
आणि सगळ्यात महत्वाचं काही तरी चांगलं घडणार आहे असा विचार करा नकारात्मकता यामुळे खूप दूर पळून जाईल,आणि चांगलं घडण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असा विचार करा.आणि चांगलं घडण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली पायरी आहे,आपले विचार सकारात्मक करणे हे जर आपण केलं तर आपल्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टींचा पाया भक्कम होतो आणि आपल्यालाही सकारात्मक विचार करण्याची सवय लागते ही फक्त आपल्यालाच नाही आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपल्या सहवासात येणाऱ्या माणसांना ही खूप काही देऊन जाते.
या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की नकारात्मकता दूर करणे आपल्याला वाटतं तेवढे अवघड नाहीये फक्त त्यासाठी कृती करणं आपल्याला काही वेळा जमत नाही किंवा ती कृती करायला उशीर होतो त्यामुळे कुठलाही वेळ न घालवता आपल्याला सकारात्मक विचार करायचे ,आपलं व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी सकारात्मक विचार करायचे धन्यवाद