Bluepad | Bluepad
Bluepad
।। मन हा मोगरा ।।
स्नेहल राणे
24th Jun, 2022

Share

सुंदरता ही चेहऱ्याची असो किंवा मनाची ती मूळातच असणं महत्वाचं..!!! फरक इतकाच असतो या दोन गोष्टींमध्ये की चेहऱ्याची सुंदरता ही दिसत असली तरी ती अजून खुलवण्यासाठी विविध उपकरणांचा, प्रसाधनांचा वापर करावा लागतो...पण मनाचं तस नाहीए.मन हे मुळातच सुंदर असावं लागत.प्रत्येकाचं मन असत सुंदर.पण त्याची जाणीव सगळ्यांनाच नसते.
।। मन हा मोगरा ।।
मनाला आपली ओळख पटवून देण्याची, कोणाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची गरज मुळीच भासत नाही तो त्या मोगऱ्याच्या फूलाप्रमाणे आपल्या सुगंधाने प्रत्येकाला आपल्याकडे ओढवून आणत असतो मुळात त्या सुगंधाच्या मोहाने सगळे त्या मोगऱ्याजवळ येत असतात .
पहिलं कस असायचं की प्रत्येक व्यक्ती आपला जोडीदार निवडताना पहीला विचार करायचा की आपला जोडीदार हा दिसायला देखणा /देखणी असायला हवी.तरच मी पुढचं पाउल उचलेन..पण आता तस नाहीए आता काल थोडाफार का होईना पण बदललाय.आता पहिली पाहिली जाते ती मनाची सुंदरता कारण,आपला जोडीदार हा दिसायला कसा आहे या पेक्षा तो गुणांनी कसा आहे हे महत्त्वाचं समजलं जातं..
"चेहऱ्याची सुंदरता कालांतराने संपते पण मनाची सुंदरता अगदी चिरकाल टिकते."
पण अजून ही एक प्रश्न माझ्या मनात आहे..तो असा की,
मनाचं खरं सौदर्य म्हणजे तरी नक्की काय..???
आनंदातून उमटलेल हास्य हे सुंदरतच असत परंतु दुःख आणि परिस्थितीती ला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य...
बाह्य सौदर्य नेहमीच आपल्याला आकर्षित करत असते पण अंतर्गत सौदर्य हे मोहक असत ते अनुभवायला प्रत्यक्ष त्या व्यक्ती जवळ बोलावं...त्या व्यक्ती ला समजून घ्याव लागत...
सुंदरता म्हणजे आपल्या आत्म्याचा तो प्रकाश जो एकदा आपल्याला दिसला ना की आपण कधीच दुसऱ्यांकडून अपेक्षा नाही करत फक्त स्वतःहून स्वतात आत्मविश्वासी राहतो.... आपला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो...अस असल्यावर फरक पडत नाही की आपण काळे आहोत ,गोरे आहोत, की सावळे आहोत... आपण सुंदरच आहोत ही एकच गोष्ट पुरेशी असते🤗😊
आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळ च असत ..मला याच उत्तर सापडलंय..तुम्हाला ही सापडेलच..
सुंदर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या सुंदरतेचा गर्व असेल तर तो सुंदर असूनही कुरुपच. कारण ज्या सुंदरतेचा आपण गर्व करतो ती सुंदरता चिरकाल टिकणारी नाहीए कालांतराने तिचा नाशच होणार आहे. ती सुंदरता आपल्या आपतकाळात आपल्या मदतीला धावून येणारी नाहीए तर मदतीला धावून येणार ते सुंदर मन आहे ज्या सुंदर मनाने आपण इतरांना मदत केली, हात दिला.चांगल्या मनाने केलेले परोपकार नेहमीच आपल्यासाठी उभे राहतात.
पाण्याला शेवाळ आलं की पाण्याचा साधा तळ ही दिसत नाही.पण तेच पाणी स्वच्छ असेल तर पाण्याचा तळ ही दिसतो.
।। मन हा मोगरा ।।
मनाचं ही तसच आहे ,मन स्वच्छ असेल, शुद्ध असेल तर ते चेहऱ्यावर आणि आपल्या नजरेत दिसत.
तुम्ही सुंदर दिसता पण आपल्यापेक्षा मोठ्या वयोवृद्ध व्यक्ती ना किंमत देत नसाल, आपल्यापेक्षा लहानांना किंवा गरिबांना नजरेसमोर उभे करत नसाल तर तुम्ही नक्कीच सुंदर नाही आहात.....
आपल्यापेक्षा आपल्या मनाची सुंदरता दुसऱ्यांच्या नजरेत झळकली पाहिजे ,हेच आपलं खरं सौदर्य❤️
मन निर्मळ तर आयुष्य सफळ..,🙏
#सौ. स्नेहल सोमनाथ राणे 🖋️

184 

Share


Written by
स्नेहल राणे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad