ही दुनिया एक मायानगरी बघा ...
नाशिवंत जीवाची हिररी बघा ...
हव्यास मनाचा वाढला किती,
स्वप्नवत मनाचा मनोरा बघा ...
मृगजळ वळणा वळणावर इथे,
पूर्ण भिजूनही उरला कोरडा बघा ...
सुंदर पडलेलं स्वप्न हे इश्वरी ,
माया गुंतलेली भावपसारा बघा ...
एका क्षणात होत्याचे नव्हते ,
अस्तित्वाची लढाई जोरदार बघा...