Bluepad | Bluepad
Bluepad
पिने वालेको पिनेका बहाना चाहिये... असा चहा..!
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
24th Jun, 2022

Share

' बायकांनी कुंकवाला,पुरुषांनी चहाला कधी नाहीं म्हणू नये. चहा पिण्याची अशी ठराविक वेळ नसते. प्रत्येक वेळ चहाची असते
'काही असले तरी वेळेवर चहाची गरज असते. मोठे मोठे कंपनीचे मालक चाची तल्लाफ झाली की अगदी ड्राइवर बरोबर रस्त्यावरल्या एखाद्या धाब्यावर उतरून चहाचा खुप रिचवल्या शिवाय पुढल्या प्रवासासाठी निघत नसते. एकदा चहा प्यायलेला असला तरी कुणी दुसरा कप आणून दिला तरी त्या कपाचा आदर होतो. चहा प्यायला जातो. खिसा मोकळा असो वा भरलेला चहाला कुठे फरक पडतो.? खिसा फुगला असेल तर मित्राच्या चहा ' चिअर्स ' करून पिला जातो. खिशात ठणठणपाल असला तर ' हाफ चहा देदो भैया ' म्हणत
' कटिंग ' वर भागवले जाते. पण चहाचे प्राशन मस्ट.चहा प्यायला, दुसर्याकडून काढून प्यायला कोठलेही निमित्त पुरेसे होते.मुलगा झाला चहा हवा, मुलगी झाली चहा मस्ट. वाढदिवस आला दे चहा,अमुक एक चांगली बातमी दिली काढ चहा. कुठलेही कारण चहासाठी पुरेसे होते. निमित्ताने चहा दिला जातो तसे चहासाठी निमित्त शोधले जाते. ' चल, जरा चहा घेऊ या ' भेटला कोणी ओळखीचा सहज बोलले जाते. चहाच्या प्याल्यामध्ये मैत्री घट्ट होते. याच चहाच्या प्याल्या मध्ये नव्या मैत्रीचे कोंब फुटतात. लग्नाची बोलणी यशस्वी व्ह्यायची तर बैठकीत चहाचे कप ट्रे मधून यायला हवाच. प्रेमाची सुरवात चहाच्या कपामधून होते. आपल्या कंपनी करता कुठलीही ऑर्डर मिळवायची ती ही आपल्याला हव्या त्या किंमतीत तर त्यांच्या हृदयात शिरण्या साठी चहाच्या कपाचा आधार घेतला की सारे होऊन जाते. मनासारखे कुठलेली दान पडायचे तर चहा हवाच. गोष्टीची सुरवात चहाने होते,गोष्टीत रंग भरतो चहाने. गोष्टीचा शेवट गोड किंवा सुखद चहाच करतो. वाह! ताज म्हणतात ते यासाठी. चहाचा एक कप गरजेचा. चहाने ऍसिडिटी वाढते , चहाने झोप कमी होते हे सारे अट्टल चहाच्या पेताड मंडळीसाठी प्रश्न आहेत. पिनेवालेको पिनेका बहाणा चाहिये असले तरी इतर पेल्यात आयुष्य बुडवून टाकण्या पेक्षा चहाच्या पेल्यात डुबावलेले कधीही ऊर्जावर्धक. पंछी अकेला देख मुझे जाल बिझाया होईल. शायद तेरे मम्मीके दिलमे शादीका खयाल आया है. ' असे गोड जळ्यातही हा चहा अलगद अडकवतो.
' पीओ और पिलाओ ' असे उघडपणे म्हणून आनंदाचे ढोही आनंद तरंग उठवणारा चहा पिऊन तरी पहा. एकदा प्याल तर सारखे सारखे याल प्यायला... चहा !
..... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर

178 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad