Bluepad | Bluepad
Bluepad
❤ आई ❤
Roshni Dabhade
Roshni Dabhade
24th Jun, 2022

Share

आई म्हणजे स्वार्थ नाही
जीवनाचा आहे ती पाया,
यातना कितीही झाल्या तिला
करत राहते ती सर्वांनवर माया॥१॥
आई ही फक्त देवकी नाही
यशोधा पण आहे की माता,
जन्म देऊनी कष्ट सोसीले
त्रास देऊ नका हो आता॥२॥
संस्कारांची देवता ती
आहे ती सुखाची सावली,
प्रत्येक प्रसंगी साथ देते
अशी ही माझी गोड माउली॥३॥
कष्ट करते प्रेमही करते
सगळ्यांना ती सामावून घेते,
दुर कुठे ती गेल्यावर क्षणा-
क्षणाला तिची आठवण येते॥४॥
मैत्रिणीच ही नात निभावते
आई होउनी ओरडा ही देते,
सगळ्या गोष्टींना सामोरे जाते
मायेने तिच जवळ ही घेते॥५॥
देवही आहे तिच्याविना भिकारी
अशी ही अमूल्य आहे ती आई,
प्रेमाशिवाय तुझ्या गं मला
नकोच पैसा अहंकार काही॥६॥
- रोशनी दाभाडे ( स्वरचित )

236 

Share


Roshni Dabhade
Written by
Roshni Dabhade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad