चव अशी कश्यातच नसे,
चहाच्या स्वादात प्रत्येक व्यक्ती फसे,
कॉफीला चहाची चव नाही येणार,
चाहासारखी तरारी कोणताच पेय नाही देणार,
सकाळचा अन् सायंकाळचा चहा पिल्यावरच भारतीयांचं मन तृप्त होणार,
चहाला सोडुन कॉफी कधीच नाही घेणार,
चव अशी कश्यातच नसे,
चहाच्या स्वादात प्रत्येक व्यक्ती फसे,
सकाळची सुरुवात अन् सायंकाळचा शेवट जर असेल होत चहाने,
तरच शांत होतात ही कंटाळ वाली नयने,
अन् चहासोबत...
मंद बरसणारी धारा पावसाची,
नभात वाजणारी कडकडाट विजांची,
कुडकुड दातांना वाजणाऱ्या त्या थंडीची,
अन् विजेने केलेल्या अचानक कळोख्यची,
चव अशी कश्यातच नसे,
चहाच्या स्वादात प्रत्येक व्यक्ती फसे...
✍︎ Snehal Survase
स्नेहल अर्जुन सुरवसे