Bluepad | Bluepad
Bluepad
बियाण्याची उगवण क्षमता 🌱
Sangeeta
Sangeeta
24th Jun, 2022

Share

दुकानातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी त्यांची थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरानं ते पाहायला जातो. त्यावेळी त्याची निराशा होते.
कारण, बहुतेक ठिकाणी बियाणं उगवून आलं नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावं लागतं. यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो.
थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येतं. पण, हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतो.
बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं.
बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात.
पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.
दुसरी पद्धत आहे पेपर पद्धत. इथं जर्मिनेशन पेपर विकत आणून शेतकरी त्यावर बियाणे ठेवू शकतात आणि त्यांची उगवण क्षमता जाणून घेऊ शकतात.
तिसरी म्हणजे कुंडी पद्धत. एखाद्या कुंडीत बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता या पद्धतीद्वारे तपासली जाते.
सगळ्यांत आधी आपल्याला एक मोठ पोतं आणि पाण्यानं भरलेली बकेट घ्यायची आहे. पोत्याला कात्रीच्या साहाय्यानं कापायचं आहे. त्यानंतर ते पोतं पाण्यात भिवजून आणि नंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे.
बियाण्याची उगवण क्षमता 🌱
सोयाबीनच्या बॅगेत मध्यभागी हात घालून एक मूठ सोयाबीन घ्यायची आहे. त्यापैकी 100 दाणे तपासणीसाठी लागणार आहेत. हे 100 दाणे त्या पोत्यावर व्यवस्थित 10 * 10 ची लाईन घेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर त्या पोत्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. ते रबर किंवा दोरीनं बांधून घ्यायचं आहे.
शेवटी__गुंडाळी माठ किंवा रांजण अशा थंड ठिकाणी ठेवायची आहे. त्यावर दररोज दोन टाईम पाणी शिंपडायचं आहे. आठव्या दिवशी ही गुंडाळी उघडायची आहे. आठव्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असते. बियाणं एकदम सरळ उगवलं की समजायचं ते व्यवस्थित आहे.
बियाण्याची उगवण क्षमता 🌱

178 

Share


Sangeeta
Written by
Sangeeta

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad