Bluepad | Bluepad
Bluepad
चहाची रंगत!
संगीता वाईकर
24th Jun, 2022

Share

चहा एक अतिशय लोकप्रिय असे पेय आहे....कुणी चहा घेता का असे म्हंटले तर .... नको असे म्हणणारे विरळाच ...चालेल !....असेच शब्द उमटतात....
चहा म्हणजे एकमेकांशी संवाद....चहा म्हणजे मैत्री....चहा म्हणजे उत्साह....आणि चहा म्हणजे आपुलकी....
एक कप चहा मुळे नाती देखील दृढ होतात ...एक कप चहाचे गप्पांची मैफल सजते....एक कप चहाने गंभीर समस्या देखील सोडवता येते ..अशी ही चहाची किमया ...
पावसाच्या सरी कोसळत आहे किंवा थंड वारे वाहत आहे ....चहाची सोबत सुखकारक वाटतेच ......चहा मग तो आपल्या प्रिय व्यक्तीने केलेला असो की टपरीवर हाफ कटिंग असो ....चहा हा तेवढाच मनाला आनंद देतो...
व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात तसे चहाचे पण अनेक प्रकार प्रचलित आहेत...प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने तो तयार करतो आणि त्याचा आस्वाद घेतो ...
चहा हे वनस्पतीच्या पानाची भुकटी ....त्यात आलं,वेलची,मिरी दालचिनी, लवंग, असे विविध प्रकार टाकून त्याची चव अधिक उत्तम केली जाते...
चहा पावडर, दूध,साखर,आणि पाणी ....असा हा साधा चहा...तर कोणी ग्रीन टी ला पसंती देतात ..बदाम पिस्ता चहा, आसाम चहा,निलगिरी चहा, बिर्यानी चहा, गुलाबी चहा, चॉकलेट चहा, दार्जिलिंग चहा,असे अनेक प्रकार प्रचलित आहे....
चहाची  रंगत!
चहा स्फूर्ती देणारे पेय...चहा घेतला की एकदम ताजे तवाने....फ्रेश वाटते हा अनुभव प्रत्येकालाच येतो...
चहातील कॅफिन आणि टॅनिन मुळे स्फूर्ती मिळते .. तर अँटिजन मुळे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते ..यातील अमिनो ॲसिड डोक्याला शांत आणि चपळ ठेवते...तर फ्लोराइड दाताना कीड लागू देत नाही आणि हाडांना बळकटी आणतो...अनेक आजारांना दूर ठेवणारा हा चहा ..
चहाला" अमृत " देखील म्हंटले आहे....जवळपास २००० वर्षापूर्वी भारतातील एका बौद्ध भिक्षूनी चहाचा शोध लावला ..एक औषधी वनस्पती म्हणून याचा वापर केला गेला ..
भारतात सर्वात अधिक चहाचे सेवन केले जाते... इंग्रजांनी चहाची लोकप्रियता वाढवली आणि चहाचे शौकीन तयार झाले....सुरवातीला फुकट दिला गेलेला चहा .... ही नंतर मात्र प्रत्येकाची आवड आणि सवय झाली....
सुरवातीला चहाच्या पानाचा वापर भाजी म्हणून केला गेला....आणि त्यानंतर एक काळे पेय म्हणून त्याचा वापर सुरू झाला....
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाम मध्ये चहाची बाग तयार केली....आणि त्यानंतर चहाचे मळे,चहाची शेती सुरू झाली आणि चहाचे चलन वाढले...
आता तर चहा हे फक्त एक पेय नाही तर ती एक संस्कृती झाली आहे...माणसांना जोडून ठेवणारी....गरम पाण्याच्या एका उबदार पेल्यात जीवनाचा प्रवाह वाहता ठेवणारी संस्कृती.......
एका लहानशा पेल्याने जग व्यापलं आहे...जग जोडलं आहे ....हा चहा भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे.... चहा सर्वच देशात वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो...प्यायला जातो....
एक आरोग्यवर्धक पेय म्हणून चहाला मान्यता मिळाली आहे... चहा कसा आणि कुठून आला याच्या देखील अनेक रंजक कहाण्या आहेतच... चहाला फार मोठी बाजारपेठ आहे...चहा तयार करण्यापासून ते चहा बनवून तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील अनेकांना एक व्यवसाय मिळवून देणारा आहे...
असा हा अमृततुल्य चहा !
संगीता वाईकर नागपूर.

361 

Share


Written by
संगीता वाईकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad