भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा, धरतीला सुजलाम सुफलाम बनवणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो. थंडी, ऊन व पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी आपल्यासाठी मेहनत करत असतो. शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आपल्याला अन्न मिळते. शेतकऱ्याचे राहणीमान अगदी साधे असते, परंतु त्याचे जीवन खडतर असते. तो रोज सकाळी लवकर उठून शेतात जातो व पूर्ण दिवस शेतात काम करतो.
शेतकरी खूप कष्ट करून शेती करत असतो. सर्वप्रथम त्याला शेतात नांगरणी करून घ्यावी लागते. त्यानंतर तो फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो.
देवाकडे लवकर पाऊस येण्यासाठी खूप प्रार्थना करत असतो. कसाबसा पाऊस येतो. मग त्याची लगबग सुरू होते बी बियाणे आणायची. त्यासाठी पैसे भरपूर पैसे लागतात. याला त्याला उधार मागून पीक आल्यावर देऊन टाकील असे म्हणुन पैसे मागत असतो. पंरतु इतक्या दिवस उधार कोणी पैसे देत नाही. शेवटी त्याला एकच पर्याय असतो. व्याजाने पैसे घेणे त्यासाठी तो सावकाराच्या घरी जातो. पैशाची मागणी करतो पंरतु सावकार कधीच एका चकरेत पैसे देत नाही. त्याला नंतर पैसे मिळतात. बि-बियाणे घेतो शेतात लावणी व पेरणी करतो. नंतर पाऊस लवकर पाऊस पडत नाही. कसातरी पाऊस येतो. पीक चांगले येते. कधी कधी दुबार पेरणी करावी लागते. नंतर त्याला त्यात खुरपनी फवारणी खूप मशागत करावी लागले. मगच पिक चांगले येते आणि शेवटच्या टप्प्यात आसमानी संकट म्हणजे पाऊस इतका येतो की आलेल्या सर्व पिकाची नासधूस करून टाकतो. शेतकर्याच्यी सगळी स्वप्नं, अशा निघून जातात. आणि शेवटी याला काहीही पर्याय नसतो. नंतर सरकार थोडी फार मदत करतो त्यात त्याला बि बियाणे घेतलेले सुद्धा पैसे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी निराश होतो. पुन्हा काही दिवसाने त्याला कर्जबाजारी व्हावं लागतं. शेत चांगले करून एखादे पीक लावावे लागते. ते पीक चांगलं येत त्याला शेवटी दोन तीन पाणी द्यायचे बाकी राहतात तो पर्यंत विहीरी आणि बोअरचे पाणी बर्यापैकी गेलेले असतात. त्यातल्या त्यात रात्रीची लाईट असते. एक छोटी बॅटरी घेऊन तो शेतकरी रात्री आपल्या शेतात गेलेला असतो. रात्रभर पाणी द्यायच म्हणुन तो बॅटरीचा कामापुरता वापर करतो. उन्हाळ्याला सुरवात झालेली असते. जमीन गरम होते. त्यामुळे पाणी देताना थंड वातावरण त्या ठिकाणी होते आणि साप, विंचू हे आपल्या बिळातून बाहेर येतात. कधी कधी नकळत शेतकऱ्याचा पाय त्यावर पडतो. आणि मग तो साप त्या शेतकर्याला चावतो. कधी शेतात काम करताना अवकाळी पाऊस येतो खूप जोरात वारं सुटतं विजा होतात. विजा पडतात आणि कित्येक शेतकरी वीज पडून मरण पावलेले आहे. कधी कधी लाईटचा सुद्धा करंट लागून शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. खूप संकट रात्रीच्या वेळी दारे धरताना किवा पाणी देताना येतात. शेत घरापासून लांब असेल तर एक दोन जण सोबत घेऊन जावे लागतात. चोरटय़ांची भीती असते. खूप संकट झेलून तो शेतकरी आपले पीक चांगल्या पद्धतीने काढतो. मार्केट ला घेऊन गेल्यावर त्याला योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे त्याला त्यात काही जास्त फायदा होत नाही. कर्ज फेडून दहा वीस हजार रुपये त्याच्या हातात येतात तेही एक वर्ष मेहनत आणि कष्ट करून. अशी आजच्या शेतकर्यांची अवस्था झाली आहे.
एकदा की निसर्गाने शेतकर्याला साथ दिली मग तो राजा होतो. मग वावर हाय तर पावर हाय हे वाक्य त्यावेळी बोलाव लागेल. पाऊस वेळी व्हायला पाहिजे असेल तर आपण खूप झाडे लावली पाहिजे. झाडे लावली नाही तरीही पाऊस पडतो परंतु तो असा पडतो की सगळीकडे पाणीच पाणी करतो. त्यामुळे योग्य पाऊस पडण्यासाठी आपल्याला झाडे लावावी लागतील त्यामुळे खूप जास्त उष्ण वातावरण होत नाही. आणि पाऊसही मापात किंवा योग्य पडतो. झाडे लावा झाडे जगवा......
बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझविन उपाशी...!!