Bluepad | Bluepad
Bluepad
ओढ प्रेमाची भाग --4
Ashok Ingole
Ashok Ingole
24th Jun, 2022

Share

सातपुडा पर्वतरांगांमध्ये हिरव्यागार वनराईने मध्ये वसलेले मोहदा शहर एक प्रकारे थंड हवेचे ठिकाण होते. प्राकृतिक सौंदर्य येथे प्रकृतीने मुक्तहस्ते उधळण आलेले होते .सर्वीकडे लाल सर माती असलेली शेती, एका उंच टेकडीवर असलेली पवनचक्की पाच मेगावाट वीज तयार करायची लांबूनच दिसायची .मध्यप्रदेश शासनाने येथे पर्यटन स्थळ म्हणून तयार केलेले गार्डन त्यात असलेली रेल्वे या परिसरात पूर्ण प्रदक्षिणा घालायची .काही ठिकाणी धबधबे उंचावरून पडतांना दिसायचे
ओढ प्रेमाची भाग --4
.पुढे गेल्यावर अशाच तीन धबधब्यांचं नदीत रुपांतर झाल्याचं मोहदाच्या एका पॉईंट वरून स्पष्ट दिसायचं अशा या स्वस्थ व सुंदर शहरात मुख्य रस्त्यालगत सेंटपाल्स मिशन द्वारा संचालित एक आलिशान दवाखान्याची इमारत होती .आवार फारच मोठा होता. सध्या मिशन ने हा दवाखाना सरकारला दिला होता. त्यामुळे नवीन डॉक्टर्स व स्टॉप ची भरती सरकारद्वारे व्हायची. याच दवाखान्यात चिल्ड्रन वार्ड मध्ये स्नेहल शिंदे ची नियुक्ती झाली होती.
स्नेहल रवींद्र साने सोबत छिंदवाडा ला निघून आली होती .पप्पांनी तिला मोबाईल दिला होता.म्हणजे केव्हाही घरी फोन करता येत होता .स्नेहल सोबत, तिची सेंट्रो कार पण घेऊन आली होती .साने चे घर व हॉस्पिटल छिंदवाडा ला शांतीनगर मध्ये होते.स्नेहल फक्त रविवारी छिंदवाडा ला जायची मोहदाला डॉक्टर्स लोकांना क्वाटर्स होते .तसेच 2 रूमचे कॉर्टर स्नेहल ला पण मिळाले होते .तिने लागणारे सर्व सामान येथेच घेतले होते .काॅट टेबल चेअर व किचन ला लागणारे सर्व साहित्य या कॉर्टर मध्ये उपलब्ध होते.तशी जेवणाची एक घरगुती मेस होती .पण स्नेहल कधी कधीच डबा मागवायची .घरात वावरताना ती साडीच घालायची कारण साडी तिला फार आवडायची त्यात तिला कम्फर्टेबल वाटायचं. तिला स्वयंपाकाची आवड होती म्हणून ती स्वतःच कुकिंग करायची .
ओढ प्रेमाची भाग --4
म्हणजे वाटेल ते बनवता येत होते. शनिवारी पहाटे सहा वाजले होते .स्नेहल ला जाग आली आळसावलेली ती उठली .हे कॉर्टर दुसऱ्या मजल्यावर होते .ती गॅलरीत आली व चेअरवर बसली .सर्वत्र शांतता होती बिल्डींगच्या गेट जवळील सदाफुली चे झाड बहरून आलं होतं . पांढरी शुभ्र फुलांची चादर पूर्ण झाडावर पसरली होती. स्नेहल बराच वेळ त्या फुलांकडे बघत होती .लहानपणी राहुल कडे गणपती बसायचा तेव्हा स्नेहल व राहुल सदाफुलीची भरपूर फुलं तोडून आणायचे आणि दोघं मिळून बाप्पा करिता हार बनवायचे. राहुलची आठवण येताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले .ती स्वतःशीच हसली नियतीचा खेळ किती अनिश्चित असतो याची तिला पुरेपूर समज आली होती. मोबाईलची रिंग वाजली तिने फोन घेतला नेहा चा फोन होता .
"बोल ग" स्नेहल म्हणाली ,
"उठलीस का ग " नेहा म्हणाली ,
"आत्ताच उठली ग"स्नेहल मंद स्वरात म्हणाली.
"ए वेडाबाई जरा नार्मल हो, मी तुला भेटायला येत आहे .उद्या सुट्टी आहे मी तिथेच थांबणार आहे .व्यवस्था होईल ना माझी ." नेहा म्हणाली .
"व्हाट ए सरप्राईज, नेहा मला किती आनंद झाला म्हणून सांगू केव्हा येतेस मी स्टॅंडवर घ्यायला येते "स्नेहल आनंदाने म्हणाली . "तर मी दुपारी एकच्या बसनी येते ती चार पर्यंत पोहोचेलंं" नेहा म्हणाली .
"ओके, मी पोहोचते " स्नेहल म्हणाली.
" ओके तर भेटू मग बाय " नेहा म्हणाली , "बाय " म्हणत स्नेहल नी फोन बंद केला .तिने लगेच साने काकांना सर्व सांगितले ते वाट बघत बसले असते कारण आज शनिवार होता. आनंदाने स्नेहल उठली .तिला आठ वाजता दवाखान्यात जायचे होते .ती तयारीला लागली. फ्रेश होऊन स्नान वगैरे आटोपून तिने फटाफट आमलेट बनवले .ब्रेडचा पुडा फ्रीजमध्ये होताच शॅलो फ्राय करून तिने प्लेट तयार केली. मरून कलरचा पंजाबी ड्रेस घालून ती तयार झाली . ब्रेकफास्ट आटोपला तेव्हा साडेसात वाजले होते .तिने स्टेथेस्कोप गळ्यात घातला व बॅग घेऊन रुम लॉक करून खाली उतरली. पार्किंगमध्ये तिची सेंट्रो कार उभीच होती .बॅग मागच्या सीटवर टाकून तिने कार स्टार्ट केली .दहा मिनिटातच ती हॉस्पिटल मधील तिच्या केबिनमध्ये होती .ती एका पेशंटचे पेपर्स बघत होती तेव्हाच ---------"मॅडम " म्हणत नर्स मीना धापा टाकत आली.
"क्या हुवा मीना ?"तिने मीनाकडे बघत विचारलं .
"मॅडम तेरा नंबर वाला संकेत अचानक सिरीयस हो गया है और आपको याद कर रहा है डॉक्टर ने उसे दवा दी है पर वह ले नही रहा है कहता है दीदी के हाथ से ही लूंगा ." मीना सांगत होती . स्नेहल त्वरेने तेरा नंबर च्या रूम कडे निघाली .रूममध्ये कॅाट वर दहा वर्षाचा संकेत झोपला होता .दोन डॉक्टर्स व दोन नर्सेस त्याला औषध द्यायचा प्रयत्न करत होते .पण तो घेत नव्हता .
"मेरी दीदी आयेगी तभी मै दवा लूंगा " तो सारखा बडबडत होता. स्नेहल त्याच्या जवळ गेली .डॉक्टर प्रकाश नि त्याच्या हातातील गोळी तिला दिली "लो दीदी आ गई है अब तो दवा लो "प्रकाश म्हणाला .डोळे बंद करून झोपलेल्या संकेतने डोळे उघडले .त्याने स्नेहल कडे बघितले व तो हसला .
"क्यू रे दवा क्यू नही ली" तिने विचारले,
" दीदी आठ दिन से आप नही दिखी मुझे .यहा और कोई भी अच्छा नही लगता सब परेशान करते है "तो म्हणाला ,
"क्या हुआ था प्रकाश सर" स्नेहल ने विचारले .
"मॅडम संकेत रात मे बेहोष हो गया था उसकी सांस भर आई थी. अभी तक वेंटीलेटर पर ही था थोडी देर पहले होश आया है .तब से आपका ही नाम ले रहा है .उसे तुरंत दवा पिला दीजिए" प्रकाश म्हणाला . स्नेहल ने नर्स जवळचा पाण्याचा ग्लास घेतला .
"संकेत मूह खोलो." स्नेहल म्हणाली. संकेत ने तोंड उघडले , स्नेहलने गोळी त्याच्या तोंडात टाकली व पाणी पाजले .
"दीदी आज यही बैठो ना" संकेत म्हणाला ,त्याचा आवाज फार मंद झाला होता ,पण तरी त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. "नही रे ,दिन भर तो नही, पर अभी बैठती हू .क्या कहना है तुझे बोल" त्याच्या पलंगावर ती बसत म्हणाली .प्रकाश ने तिला बाहेर बोलावले .ती दारा बाहेर आली "मॅडम हमारा संकेत बस कुछ ही घंटे का मेहमान है ,उसका कॅन्सर लास्ट स्टेज पर है ,पिछले 5 साल से यह हमारे साथ था ,आज जा रहा है ,सबको रुलाता हुआ" प्रकाश चे डोळे डबडबले होते. स्नेहलच्या नजरेसमोर तो प्रसंग आला जेव्हा प्रथमच तीने संकेतला बघितले होते.----""स्नेहल ला या दवाखान्यात येऊन पाच दिवस झाले होते .ती आपल्या केबीन मध्ये बसली होती. एक नर्स आली" मॅडम डॉक्टर भटनागर ने आपको बुलाया है " ती म्हणाली, " आती हू" म्हणत स्नेहल उठली . डॉक्टर भटनागर च्या केबिन मध्ये गेली .भटनागर एक सीनियर डॉक्टर होते व एक्सपर्ट सर्जन होते. ते अंदाजे 45 वर्षांचे असतील .गौरवर्ण मध्यम उंचीचे सडपातळ देहयष्टीची चे पण कायम गंभीर राहणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते .स्नेहल आत गेली . त्यांनी तिला समोर बसण्याचा इशारा केला. स्नेहल बसली .
"आपने बुलाया सर" तिने विचारले .
"हां मॅडम मुझे आपसे संकेत के बारे मे बात करनी है. जो तेरा नंबर का पेशंट है .वह दस वर्ष का अनाथ बालक है .जिसे किसीने इस मिशनरी के अस्पताल के दरवाजे पर छहमाह की अवस्था मे ही छोड दिया था .वही हम सबके साथ रहते हुए बडा हुआ मगर 2 वर्ष पहले ही उसे कॅन्सर डिटेक्ट हुआ .बडा ही मासूम बच्चा है उसने जीस दिन से तुम्हे देखा है उसने यहि रट लगाई है कि मुझे मेरी दीदी से दोस्ती करनी है क्या उससे दोस्ती करोगी " डॉक्टर भटनागर म्हणाले. स्नेहल ला फार आश्चर्य वाटलं .तिने पण संकेतला बघितले होते व तो मोहक मुलगा तिला फार आवडला होता " यस सर मै कभी भी उससे दोस्ती करने को तयार हूं " ती प्रसन्नपणे म्हणाली होती.
"संकेत " डॉक्टर भटनागर ने आवाज दिला ,तसाच आतील रूम मधून एक आकर्षक मुलगा बाहेर आला, त्याने हसतच दीदी म्हणत स्नेहल चे दोन्ही हात पकडून घेतले ,
"हो गई न दोस्ती ?" डॉक्टर भटनागर ने म्हटले.
"हांअंकल अब दीदी मेरी हो गई यह मुझे बहुत अच्छी लगती है" संकेत म्हणाला ,स्नेहल ने प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला होता ,तेव्हापासून रोज त्याचं जेवण औषध घेणं सर्व काही स्नेहल सोबतच व्हायचं तिला संकेतचा फार लळा लागला होता .आणि आणि आता डॉक्टर प्रकाश यांनी सांगितले की फक्त दोन किंवा चार तास बस .स्नेहल पूर्णपणे हादरली तिने दारातून संकेत कडे बघितले तो तिला हाताने बोलवत होता .स्नेहल धावतच गेली व तिने त्याला कवेत घेतले. तिचे डोळे वाहत होते .अश्रूंचा बांध अनावर झाला होता.
" दीदी दीदी क्या हुआ क्यू रो रही हो " संकेत तिच्याकडे बघून म्हणाला ,
"आज तूझ पर बहुत प्यार आ रहा है " ती रडतच म्हणाली,
" ये कैसा प्यार है दीदी तुम तो रही हो " त्याने आपल्या हाताने तिचे अश्रू पुसले.
"अरे पगले यह आनंद के आंसु है कुछ खाया कि नही "
"ना दीदी आज कुछ भी खाने का मन नही कर रहा है" त्याने स्नेहल चा आधार घेत बसायचा प्रयत्न केला ,डॉक्टर प्रकाश नि त्याला आधार देऊन बसविले ,संकेतचा चेहरा फार थकल्यासारखा दिसत होता तरीही तो स्नेहल सोबत आनंदित होता स्नेहल नी कसेबसे डोळे पुसले व ती सामान्य राहण्याचा प्रयत्न करत होती . अचानक संकेत च्या पोटात दुखायला लागलं .
"दीदी दीदी " तो जोरात किंचाळला "दर्द हो रहा है " पोट धरून तो पलंगावर लोळायला लागला ,त्याचे डोळे विस्फारले होते वेदना जाणवत होत्या. दोन नर्सेस धावत आल्या त्यांनी त्याला दोन्ही बाजूंनी धरले ,डॉक्टर प्रकाश ने त्वरेने इंजेक्शन त्याच्या दंडाला टोचले थोड्याच वेळात तो बेशुद्ध झाला. स्नेहल डोळे पुसतच बाहेर आली .तिला त्याच्या वेदना बघवत नव्हत्या. या दोन महिन्यात त्याच्या भोळ्या स्वभावाने ती मनाने फारच त्याच्याजवळ गेली होती .स्नेहल बाहेर आली तेव्हा डॉक्टर भटनागर समोर उभे होते .त्यांचे पण डोळे डबडबले होते .
"डॉक्टर शिंदे सब्र से काम लो यह तो होना ही था ." ते गंभीर स्वरात म्हणाले "शायद उस अनाथ के नसीब मे यही सब लिखा था " त्यांनी रुमालाने डोळे टिपले व लगेच संकेतच्या रुम मध्ये गेले स्नेहल स्टाफ रूम मध्ये आली. तिने स्वतःला सावरले .तिचा राऊंड होता ती लगेच दोन नर्सेस सोबत चिल्ड्रन वार्ड कडे निघाली .राउंड संपायला दोन तास लागले .स्नेहल स्टॉप रूम मध्ये आली. बारा वाजले होते .नर्सने आणलेली फाईल चेक करत होती .तेवढ्यात -----मीना धावतच आली ,"मॅडम अपना संकेत गया " ती जोरात ओरडली व रडायला लागली .स्नेहल ने विचित्र नजरेने तिच्याकडे बघितले. तिला धक्काच बसला.हे घडणार होतं हे माहीत असून पण घडल्यावर मात्र धक्काच बसला. ती निर्विकार नजरेने मीनाकडे बघत होती. मीना 23 वर्षीय गौरवर्णीय तरुणी बंगालची राहणारी नर्सिंगचा कोर्स करून येथे लागली होती .दोन वर्षापासून ही संकेत वर पूर्ण लक्ष ठेवून होती व त्याला लहान भावाप्रमाणे चाहत होती .तिचा लहान भाऊ कलकत्त्याला एक्सीडेंट मध्ये वारला होता त्यामुळे संकेत वर तिचा जास्तच जीव जडला होता. "मॅडम मेरा एक और भाई चला गया अब मै किसी को भाई नही बनाऊंगी " ती ओक्साबोक्सी रडत होती. स्नेहल ने तिला कवेत घेतले होते . "नही मीना ,उसे जाना ही था वो चला गया,तूम अपने आप को संभालो ,मै खुद दो माह मे ही उसके प्यार मे बंध गई थी अब हमे अपने आप को संभालना होगा" स्नेहल म्हणाली.
"हां दीदी ,सॉरी मॅडम" मीना गडबडली.
"ना" स्नेहल ने तिला खुणावले "तुम तो मुझे दीदी ही कहो. इतनी प्यारी छोटी बहन कीसे अच्छी न लगेगी " तिचे डोळे पुसत स्नेहल म्हणाली.
"ओह दीदी ,संकेतने तुम्हे बराबर पहचाना था " ती म्हणाली . दुःखावर आनंदाची रेष तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली.
" मीना अभी वह कहां है?" स्नेहल ने विचारले.
"डॉक्टर भटनागर उसे ऍम्ब्युलन्स मे कही ले गये" मीना म्हणाली.
"कहां?" स्नेहल ला आश्चर्य वाटले,
"पता नही दीदी ,कह रहे थे मिशन के अनाथालय ले जाना है " मीना म्हणाली.
"उनके आने पर ही पता चलेगा" स्नेहल चेअरवर बसली "तेरा खाना हो गया?" तिने विचारले.
"अभी कहा दीदी तेरा नंबर क्लियर करना है डेढ बजे हमारा टिफिन का समय है " तिने बाहेर बघितले "चलती हूं दीदी " मीना निघून गेली.
स्नेहल विचारात पडली ,भटनागर संकेत ची बॉडी कुठे घेऊन गेले असतील? पेशंटचे पेपर्स क्लियर करत दोन वाजले. स्टाफ रूम मधून निघून स्नेहल तिच्या केबिन मध्ये येऊन बसली .नर्सेस ने काही पेशंटचे एक्स-रे रिपोर्ट आणले होते .तिने स्क्रीनवर लावून सर्व एक्स-रे तपासले. तेवढ्यात मीना टिफिन घेऊन आली .
"दीदी आज मेरे साथ खाना खाइये मैने खुद बनाया है" तिने टिफिन बॉक्स स्नेहल समोर टेबलवर ठेवला ,"मेरे हात का चलेगा ना मॅडम ,सॉरी दीदी?"
"हां हां क्यू नही " स्नेहलनी तीला पण समोर बसवले मीनाने केबिनमधील कपाटातून फ्लॅट काढली आणि स्नेहल ला वाढलं व नंतर स्वतः डबा घेऊन बसली.
"शलजम की सब्जी चलेगी ना दीदी"? तिने विचारले.
"हां हमारे महाराष्ट्र मे बहुत कम चलती है ,मगर यहां जिस तरीके से बनाते है काफी स्वादिष्ट लगती है." स्नेहल म्हणाली. दोन पराठे आणि भाजी वर तीने ताव मारला, जेवण आटोपून मीना निघून गेली. संकेत गेल्यामुळे चिल्ड्रन वार्डमधील वातावरण दुःखद झालं होतं प्रत्येकाला हळहळ वाटत होती .एरवी कितीकच मृत्यू व्हायचे पण जवळचा असा मृत्यू झाल्यामुळे सर्व डॉक्टर्स व स्टाफ दुःखी झाला होता. सर्व काम आटपत स्नेहल ने घड्याळाकडे बघितले पावणे चार वाजले होते. चार वाजता नेहा येणार होती .तिने पेपर ठेवले. ओढणी व्यवस्थित करून ती केबिन बाहेर पडली.
चार वाजता तिची कार बस स्टॅन्ड च्या पार्किंग मध्ये उभी होती व ती गाडीत बसूनच नेहा ची वाट बघत होती .पंधरा मिनिटानंतर तिला समोरून नेहा येतांना दिसली. तिने स्नेहलची ग्रे कलरची सेंट्रो लांबूनच ओळखली होती .
"हाय स्नेहा" जवळ येताच तिने हात दिला. स्नेहल ने बाजूचे दार उघडले .एक छोटी बॅग मागच्या सीटवर टाकत नेहाने जवळ बसत तिला मिठी मारली.
"अगं --अगं किती जोरात" स्नेहल स्वतःला सोडवत म्हणाली.
"तू आहेसच इतकी गोड की दिल मानता नही " शायराना अंदाजात ती म्हणाली "पण तू इतकी उदास का दिसतेस " नेहाने परत विचारले.
"काही नाही ग पण तो संकेत होता ना ज्याच्याबद्दल मी तुला मागे सांगितले होते " स्नेहल म्हणाली,
"हो त्याला कॅन्सर होता ना " नेहा ने विचारले.
"हो ग तोच आज तीन तासापूर्वीच गेला " उदास स्वरात स्नेहल म्हणाली.
"काय ?फार वाईट झाले ग पण लवकर सुटला पुढील नरक यातनेतून, आय एम सॉरी " नेहा पण उदास झाली.
"त्यामुळेच थोडं उदास वाटत आहे" म्हणत स्नेहलने कार स्टार्ट केली व गिअर टाकून आपल्या कॉर्टर कडे वळविली .आता दोन दिवस नेहा इथेच थांबणार होती.
--------------*------------------*-----------------*-------------
नेहा सोमवारी सकाळच्या बसने जावरा ला निघून गेली.दोन दिवस स्नेहल चे फार मजेत गेले .संकेत गेल्याचं दुःख मात्र होतच स्नेहल नेहाला सोडून हॉस्पिटलमध्ये गेली वर्दळ नेहमीप्रमाणेच होती .कार पार्क करून ती केबिनमध्ये गेली .मीना आत मधेच उभी होती.
"दीदी आपको भटनागर सर ने बुलाया है " तिने म्हटले.
"क्यू क्या कुछ खास बात है"?
" पता नही दीदी ,लेकिन आये बराबर मुझे कहा कि शिंदे मॅडम को तुरंत भेजो " ती म्हणाली .
"ठीक है, तू चल मै आती हूं" म्हणत स्नेहलने पांढरा ओवरकोट घातला स्टेथेस्कोप व आयकार्ड घेत ती भटनागर यांच्या केबिनमध्ये गेली .डॉक्टर भटनागर आपल्या चेअरवर शांत व गंभीर चेहऱ्याने बसले होते .स्नेहल ला बघताच म्हणाले--"बैठो बेटा तुम्हे कुछ बताना है", स्नेहल ला आश्चर्य वाटलं ,नेहमी डॉक्टर शिंदे म्हणणारे भटनागर सर आज तिला बेटा म्हणून संबोधित करत होते ,ती त्यांच्या समोरील चेअरवर बसली.
"स्नेहल आज तुम्हे मै वह सब बता रहा हूं जो केवल मै ही जानता हूं " भटनागर शांत स्वरात म्हणाले.स्नेहल त्यांच्याकडे बघत होती. "बेटे जब मै जबलपुर मे शासकीय अस्पताल मे था तभी डॉक्टर कपूर अर्थात डॉक्टर शिवानी से मेरी मैत्री हो गई थी.हम दोनो साल भर मे एक दुसरे के काफी करीब आ गये थे.अगले ही वर्ष मेरा तबादला यहा हो गया शिवानी वही रह गई वह बंगाली थी इस कारण घर वालों का विरोध था.
इस बिच शिवानी के घर वालों ने उसका ब्याह पक्का कर दिया उसकी शादी के एक माह पूर्व ही किसीने संकेत को यहा 6 महिनेकी अवस्था मे इस अस्पताल के दरवाजे पर ला कर छोड दिया.अन्य बच्चो की इतरही मिशन के अनाथालय मे उसका दाखिला दे दिया गया .जब वह 4साल का हुआ था तब मुझे एक पत्र मिला ,पत्र न्यूयार्क से आया था और भेजने वाली का नाम डॉक्टर शिवानी हलदर था.और इसी पत्र से मुझे पता चला कि संकेत मेरा ही बेटा था जिसे शिवानी यहा छोड गई थी और शादी के बाद वह अपने पति तपन हलदर के साथ न्यूयार्क चली गई थी .सोच लो स्नेहल तब मेरी क्या अवस्था हुई होगी .बेटा मेरे सामने था पर मै उसे बता नही सका की मै ही उसका पिता हूं.उसे कॅन्सर हो गया तो मैने उसे यही ऍडमिट करा लिया तील तील भर मै उसे देखकर मरण यातना झेलता रहा" त्यांचे डोळे पाणावले शब्द पण दाटले.
"और इसी कारण उसका अंतिम संस्कार करने मै उसे यहा से दूर ले गया था .उसे तुम पर काफी स्नेह था वह तुम्हे बहुत चाहता था. मुझसे कहा था अंकल आप मेरी दीदी का खयाल रखना उसे कोई तकलीफ ना दे, उसे पता था कि वह जानेवाला है" डॉक्टर भटनागर ला अश्रू आवरणे कठीण झाले व ते गालावर वाहू लागले स्नेहलच्या पण डोळ्यातून अश्रू वाहतच होते तिने त्यांच्या हातावर हात ठेवला .
"सर इस तरह कमजोर मत बनीये हिंमत से काम लीजिए" ती म्हणाली.
"हिम्मत तो आयेगी बेटा ,पर आखीर तक एक बात चुभती रहेगी की संकेत को बता नही पाया की मै उसका बाप हूं" डोळे पुसत डॉक्टर भटनागर म्हणाले.---"आज यह बात तुम्हे इसलिये बताइ क्युकी तुम उसकी चहेती दीदी हो.बेटे तुम्हे जब भी कोई मदत लगे या कोई परेशानी हो तो इस अंकल को अवश्य बताना और यह सत्य अपने तक ही रखना " भटनागर शांत स्वरात म्हणाले.
स्नेहल चा राऊंड राहला होता मीना सर्व सामान घेऊन आली होती. "जाओ अपना काम पूरा कर लो " डॉक्टर भटनागर म्हणाले दोघी केबिन बाहेर निघून गेल्या.
-*-----------*--------------*----------------*-------------*--
(क्रमशः) ओढ प्रेमाची भाग-4 पूर्ण

178 

Share


Ashok Ingole
Written by
Ashok Ingole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad