फुर्सत मिले तो आजाओ चाय पे चर्चा करेंगे ☕☕
चहा हे माझं आवडतं पेय. चहा पिताना एखादी कंपनी सोबत असली तर त्याची लज्जत आणखीन वाढायची पण प्रत्येक वेळेला शक्य नसायचं तो सोबत आहे असं समजूनच चहाचा भुरका घेताना अनेक आठवणी दरवळायचा तसा चहा आणि आठवणी यांचं खूप मोठं रसायन आहे. चहाची तल्लफ जीव वेडा पिसा करते मला. तसा दिवसातून दोन कप चहा पण अगदी क** अद्रक आणि वेलची टाकलेला पडायला लागला की हळूच दुध आणि कपात गाळून घेतला की मस्त मलई टाकून चहाचा घोट घ्यायचा.
प्रत्येक चहाच्या घोटा सोबत एक एक आठवण ठेवायची तसा पावसातला चहा खूपच धोंडी देऊन जातो खिडकीतून पाऊस पाहात चहा घेण्याची मजा काही औरच वाफाळलेल्या चहा मुळे कधीकधी चष्म्याची काच दुसर होते चष्मा काढून ठेवायचा आनंदाचे दुःखाचे साठवलेले क्षण पापण्यांच्या पखाली तून बाहेर पडायचे. बऱ्याचदा भिजलेल्या पावसात खूप रडून हे घेतला आहे तसे रडण्यासारखी खूप मोठे दुःख परमेश्वर वाट्याला देऊनही त्याला सामोरं जाण्याचं बळ अनेकदा द्यायचा त्यामुळे ते हलकं वाटायचं. उन्हाळा पावसाळा हिवाळा आयुष्यामध्ये जिव्हाळा ही महत्त्वाचा. या पावसात मनातली हिरवळ ताजीतवानी होते विचारांची पात हलू गुरु लागतात. आनंदाच्या मनाच्या लहरी पारंगत करण्यापर्यंत ओलावा घेऊन जातात. या पावसा मध्ये अनेक गोष्टींना वाट करून दिली जाते तो मातीचा सुवास गार हवा तो पाऊस मग हवाहवासा वाटू लागतो