Doctor भेटले . Moderate to sever depression निदान लागले . महिन्याचा गोळ्यांचा कोर्स दिला आहे.महिन्याभरात नंतर मग दोघांची couselling घ्यावी लागेल म्हणाले .
सर्वच थांबल्या सारखे वाटत आहे . वडिलांचे ते प्रश्न आणिकाही लोकांची स्वतः ची सर्व व्यवस्थित असतानाची आयुष्याची राय सांगणे एकावत ही नाही . तुला काय झाले आहे ..सर्व तुझे आहे हे मानायला ... आनंदी राहायला . हिसकावून हकानी जगायला ....याचे उत्तर काय ? मीही असा एक प्रश्न विचारू शकते तुम्हाला काय झाले होते माझी ही अवस्था होई पर्यंत शांत राहायला .
Depression चे पहिले लक्षण म्हणजे नकारात्मक विचार . अगदी नॉर्मल माणसांप्रमाणे आपण सकारात्मक विचार करू शकत नाहित .
पुण्याच्या एक समुपदेशक याच्या कढून मला तीव्र Depression असल्याचे निदान लागले . आणि त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविले . ज्या दिवशी कळले त्या दिवशी वाईट वाटले पण त्यात परत शंका कदाचीत खुप रडत होते म्हणून depression दिले असावे. काल तज्ञांना दाखवल्यानंतर त्यांनीही तेच सांगितले आणि औषध घेतल्या शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले . आज औषधाचा पहिलाच दिवस , डोके चालणे बंद झाले आहे. काहिच विचार येईनात सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही नाही . आत्ता काय करायचे आहे हे कळेना . आज मुलांची शाळेतील मीटिंग तर कहीच कळली नाही. पंधरा दिवसांच्या औषधांनी काय काय होणार काय माहित?....