पाहिले तुला म्या आण हात जोडीलो,
डोळे मिटले माझे चित्त समाधान झाले.... ,!!
कानी पडता टाळ, चिपळ्या, अण अभंगाचा नाद
तुकड्या सांगतो एकदा हरी भक्तीत नांद...!!
भरकटण्या,फरकटण्या आधी तु वारी गाठ,
उतरत्या वयात नाय, नव तारूण्यात तु वारी गाठ,!!
निःस्वार्थता हीच खरी जीवाची श्रीमंती,
तु, कर्म करण्या बळ दे, हीच खरी पांडुरंगा विनंती.!!
____ शशी केंद्रे ✍️