आपल्याला खानपाणापासून 🍲🍲🍜🍜🥗🥗🍲🍲 ये चित्रपट पर्यंत अनेक गोष्टी आवडत्या किंवा नावडत्या असतात. लहान मुलांचे तर फारच नखरे खाण्याबाबतीत. असो.पण आवडता आणि नावडता सूर्य ?
हो असतो. अहो तो आकाशातला सूर्य ☀️ नव्हे विचारांचा सूर्य , तेजोमय सूर्य , दाहक सूर्य , प्रखर सूर्य , विवादास्पद सूर्य . ओशो.
आचार्य रजनीश ओशो. भारतभूमी chya पटलावर चा एक वलयांकित सु र्य ओशो.
आचार्य रजनीश ओशो.काय करायचं यांच्या जन्म आणि मृत्यू chya तारखा माहिती करून घेऊन ? अशी माणसे कालातीत असतात. काळाच्या परिमानामध्ये त्यांना बांधता येत नाही. ही माणसे काळाच्या कित्येक दशके ,शतके पुढे असतात.
असाच हा माणूस ओशो. हॉलिवूड chya चित्रपटान मध्ये दाखवतात तसे time machine चा वापर करून भविष्य तून आलेला माणूस जणू.
विवाद आणि ओशो यांचे हाडा मासा सारखे घट्ट नाते.अगदी अखेरच्या क्षणापर्यंत. या सर्वसाधारण उंचीच्या आणि ताकदीच्या माणसाची मानसिक ताकद इतकी जबरदस्त होती की त्याने तत्कालीन सुपरपॉवर अमेरिकन सरकार ला ही हादरवून टाकले. त्याने ख्रिस्ती पोप ( सर्वोच्च धर्मगुरू ,व्हॅटिकन सिटी) यांना वाद विवादांचे खुले आव्हान दिले.पण या आत्यंतिक तर्कशुद्ध माणसा पुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून पोप नी च ते नाकारले.
या सर्वांमुळे की काय प्रचंड दबावाखाली येवून तणावाखाली येवून अमेरिकन सरकारने त्यांना अमेरिकेत राहण्यास मनाई केली. शिवाय त्याचा अमेरिकेतील एकत्र शेकडो एकर मध्ये वासवलेला आश्रम अमेरिकन नी उध्वस्त केला.
असो तर असा हा ओशो .अत्यंत तर्कनिष्ठ ,अत्यंत वास्तव दरशी ,अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत परखड माणूस.
महान हा शब्द ज्या अत्युच्च लोकांसाठी मानवी संस्कृती ने तयार केला
ओशो त्यातलाच एक लखलखता सूर्य ☀️
ओशो नी कोणते विषय हाताळले ?
ओशो ने कोणते विषय हाताळले नाहीत ? जे जे म्हणून समाजात विवादाचे विषय होते ते सगळे हाताळले.
सेक्स पासून धार्मिक विषायांपर्यंत संभोगापासून साधनेपर्यंत अनेक अनेक विषयावर तो बोलला.
हिंदू संस्कृती पासून भारतीय सांस्कृतिक इतिहासा पर्यंत बोलला. परंपरा आणि रुढ वादी गाळाच्या चिखलात गुरफटलेल्या हिंदू समाजावर त्याने आसूड ओढले. पण त्यामागे कोणती ही असूया किंवा बदला घेण्याचा भाव नव्हता. हिंदू समाजात सुधारणा व्हावी हाच त्यांचा उद्देश.
राम आणि कृष्ण यांच्यावरही ओशो बोलले.रामा हुन त्यानिकृष्णावर अधिक भाष्य केले. १६ कला संपूर्ण कृष्ण समजावून घ्यावा तर तो ओशो कडूनच.🦚🦚
तशी त्यांनी रामावर आणि आपल्या खास शैलीत कृष्णावर टीका ही केली. पण कृष्ण सांगताना ते आणि आपण ते ऐकताना दोघे कधी कृष्ण मय होवून जातो याचे भानच राहत नाही.
हिंदू ऋषी मुनी याची त्यांनी यथेच्छ खिल्ली उडविली पण त्याच वेळी कबीर उलगडून दाखवला मीराबाई समजावून सांगितल्या. अस्सल हिर्यांचे ते अस्सल पारखी होते.
अनेक पश्चिमेकडील विचारवंत आणि तत्ववेत्ता यांचे विचार ,भूमिका त्यांनी जगासमोर मांडल्या.
स्त्रिया chya बाबतीत तर त्यांचे विचार इतके वास्तविक आणि भविष्य कालीन होते की काय सांगावे ?
आपण एखाद्या व्यक्ती ला वाईट म्हंजे वाईट च गृहीत धरतो आणि एखाद्याला चांगले च गृहीत धरून त्याच्या विषयी आपले मते मांडतो.
ओशो चे ते नव्हते तो व्यक्ती तील गुणांची पारख करायचा. तो टीका करायचा ते व्यक्तीवर नव्हे तर तिच्या तल्या अवगुणांवर आणि कौतुक करा याच ते ही गुणाचेच व्यक्तीचे नाही. म्हणूनच तर एकाच वेळी ती गांधी वर जोरदार टीका ही करायचा आणि काही ठिकाणी त्यांचे तोंड भरून कौतुक ही. ऐकणारे लोक मग संभ्रमित होवून जायचे. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती मी व्यक्ती नाही गुणांचा चाहता आहे.
आपल्याला शाळेत घरात नेहमी खरे बोलावे हे शिकवले जायचे.पण ओशो म्हणतो नेहमीं खरे बोलून आयुष्य नीट जगता येणारच नाही. थोडीशी कल्पना केली की आपण पूर्ण खरे बोलू लागलो अगदी सगळ्यांशी च तर तसे जगणे शक्य होईल का ? की आयुष्याची पुरती वाताहत होवून जाईल आपल्या आणि आपल्या कुटुंबाची ही. मग ओशो chya बोलण्यातील सत्यता लक्षात येते.
सेक्स या आपल्या देशात ज्या विषयाचा उच्चार ही पाप समजले गेले त्या विषयावर त्या काळात तो माणूस कित्येक प्रवचने बोलला. त्याच कारणास्तव तो भारतात विवादास्पद व्यक्ती बनला. पण असल्या विवादाना त्याने कधीच भीक घातली नाही. जो येईल त्याला अंगावर घेतला आणि उचलून आपटला दाणकन खाली ( आपल्या तर्क निष्ठ तेणे ) .
मला तर वाटते तो ते विवाद मुद्दाम आपल्या कडे ओढून घ्यायचा जेणेकरून त्याच्या विचारांकडे लोकांचे लक्ष जाईल
भले त्यासाठी त्याला स्वतः ला बदनाम व्हावे लागले तरी चालेल.
ओशो ची काही खास भलतीच मजेदार पात्रे ही असायची त्यांच्या द्वारे तो मोठ्या मजेदार शैलीत आपले विचार मांडत असे.त्याची ती शैली खूपच खुमासदार , मजेशीर आणि मनापासून खळखळून हसवणारी होती.
ओशो बद्दल जितके सांगावे तितके थोडेच आहे. लिहू लागलो तर वेळ पुरणार नाही इतके.म्हणूनच आणखी ही डिटेल लिहीन पण नंतरच्या लेखात.
जाता जाता इतकेच सांगेन मला जन्म आई वडिलांनी दिला ( त्यांचे उपकार तर आहेतच ) पण जगायला ओशो ने शिकवले. मी शाळा ,कॉलेज मध्ये शिकलो पण मला विचार करायला ओशो ने शिकवले. याहून आणखी काय लिहू ओशोचे मोठेपण .पण तरीही मी त्याला नावडता सूर्य म्हंटले कारण तो खरेच सूर्यासारखे प्रखर व्यक्तिमत्त्व घेवून जन्माला आला होता.पण तो सकाळचा किंवा संध्याकाळचा मवाळ सूर्य नव्हता ऐन मध्यानीचा ( दुपारचा ) रण रणता आत्यंतिक प्रखर सूर्य ☀️ होता.
आचार्य रजनीश अर्थात ओशो बद्दल आणखी माहिती पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत तुम्हा सर्व प्रिय वाचकांना माझा स आदर 🙏🙏🙏