ब्रेक संपला आणि सर वर्गात परत आले. सर्व वर्ग शांत झाला. लेक्चर झाल्यावर सरांनी जाता जाता एक बॉम्ब टाकला. "मुलांनो उद्या तुमची सराव परीक्षा आहे. त्यामुळे तयारी करून या". अस सांगून ते निघून गेले. सर गेल्यावर नितीन स्वतः च्या नोट्स काढून वाचू लागला. त्याला असा अभ्यास करताना पाहून जय हसू लागला व तिथून निघुन गेला. दुसऱ्या दिवशी सर पेपर घेऊन वर्गात आले व सर्वांना सोडवायला दिले. सर्वांनी त्यांना जमेल तसा पेपर सोडवला. पण जयला मात्र काही जमेना. पेपरमध्ये जे गुण होते त्यातही नितीन पुढे होता व जयला खूप कमी गुण पडले होते.
जेव्हा त्यांचा ब्रेक झाला तेव्हा जय नितीनला भेटला तेव्हा त्याने विचारले "नितीन सर्वांना एक दिवसच भेटला होता तरी तुला इतके मार्क कसे"? त्यावर नितीन ने जयला विचारले, "जय तू काल किती अभ्यास केला होता परीक्षेचा"? जय ने सांगितले, "खर सांगू मी नाही अभ्यास केला. कारण मला वाटलं एका दिवसात असा किती अभ्यास होणार? जे काही वाचेन तेही अर्धवट असणार. जर काही कव्हर होणारच नसेल तर न केलेला बरा". "हेच तर चुकल तुझ मित्रा! तुला वाटत होत की फक्त एकच दिवसात किती अभ्यास होणार? पण तुझ्याकडे या एका दिवसात प्रत्येक तासाला चॉइस होती की तू जमेल तेवढे पॉइंट्स काढून त्याचा अभ्यास करशील. यातून तुला खूप जास्त मार्क मिळाले असते अस नाही. पण तुला पेपर मधील काहीच समजणार नाही अस झाल नसत. तू काल मला अभ्यास करताना पाहून हसला होतास. पण मी कालपासून जितके शक्य होतील तितके पॉइंट्स वाचण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मला हे मार्क पडले. माझ्याकडे पण अभ्यास न करण्याची चॉइस होती. पण मी अभ्यास करण निवडलं". नितीन.
"मला सांग तू जर रात्री अचानक आजारी पडलास तर आता कसं जाणार अस म्हणून बसून राहतो की डॉक्टर कडे जातो"? जय म्हणाला, "डॉक्टर कडेच जाणार नाहीतर मी अजून आजारी पडेन ना"! "बरोबर, म्हणजे आपल्याला कितीही वाटत असलं की वेळ निघून गेली आता आपण काही शकत नाही तरी अस होत नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य असत आणि त्यात आपण चांगल्या पद्धतीने ती गोष्ट करू शकतो. आपली समस्या सोडवू शकतो. मग करणार ना पुढच्या वेळी अभ्यास"? नितीन. जय ने उत्साहाने उत्तर दिले, "हो करणार ना. निदान प्रयत्न तरी नक्की करणार".