Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ....
विश्वास बीडकर
24th Jun, 2022

Share

......राजकारणी सेवा ...
प्रत्येक पक्षालाच करायची आहे
लोकांची सेवा .
मग का फिरतोय सुरतेहून
गौहत्तीकडे थवा .
यांच्या नाटकीपणापुढे खरा
रंगमंचही लाजला .
याच टेंशनने वर्षा बंगला
पार थकला .
विरोधी पक्षाच्या बाकांवर सगळे
बसायला तयार .
पण लगेच खणायला घेतात
गद्दारीचं भुयार .
फाईव्ह स्टार हॉटेल , चार्टर्ड प्लेन ,
हीच लोकांची सेवा .
सत्तेच्या बॉक्स मध्येच हवा आहे
चवदार मेवा .
दोन दिवसांची फितुरी चार दिवसांनी सगळे एकत्र .
समोरच्याच्या खिशात मात्र असावे राजिनाम्याचे पत्र .
वेडे ठरू आपण पाहून यांनी केलेली आपली सेवा .
सोडलं पाहणं म्हणतं , परत
टी .व्ही .कडेच धावा .
विश्वास बीडकर .
२४ जुन २०२२ .
शुभ शुक्रवार .

177 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad