पर्यावरण संवर्धनात मी एकटा काय करू शकतो?..
खूपदा आपण मोठया मोठया समस्यांवर काहीच उपाय नाही म्हणून social media च्या अनेक माध्यमावर चर्चा करत राहतो. चर्चेत भाग घेणं हे सुदृढ मनाच व मेंदू च ही लक्षण आहे, पण ह्या सोबत च वयक्तिक स्तरावर आपण असं काय करू शकतो ज्या तुन ह्या समस्ये वर माझे स्वतः चे प्रयत्न दिसतील..
आज च पेपर ला बातमी आहे " बदलापूर चा काळा राघू धोक्यात " हे जांभूळ च्या स्थानिक प्रजातीच नाव आहे. आपल्याही भागात अशा काही स्थानिक प्रजाती असतील ज्यास जतन करण्याची,
संवर्धनाची गरज आहे.आमचे एक सहकारी मित्र तहसीलदार श्री आकाश लिगाडे हे आपल्या स्थानिक मूळ गावात हे प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्या स्टेटस वर रोज गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या वाढदिवशी , लग्न वाढदिवशी शी किंवा आणखी काही खास दिवशी एक किंवा अधिक झाडें लावलेली असतात. गावात झाडें केवळ लावली च जात नाही तर ती जगवली ही जातात.
असा प्रयत्न आपण सर्वजण करू शकतो, झाडें लावून न थांबता त्याची देखभाल ही प्रत्येकाने केवळ एक झाड अशी केली व त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रजाती जगवल्या तर " बदलापूर च्या काळ्या राघू सारखी स्थिती इतर प्रजातीची होणार नाही. ती बी जमा करून सीडबॉल तयार करून पावसाळ्यात जगवली तर.. आपल्या परिसरातील स्थानिक प्रजाती स्थानिक सामाजिक वनीकरण रोपवाटिकेत तयार होतेय का? ह्या वर लक्ष दिल्यास वर्तमानपत्रातील ह्या बातमीने वाटणारी अस्वस्थता काही अंशी कमी होईल..
काल 23 जून 2022 ला मा जिल्हाधिकारी ह्यांच्या व मा जिल्हा पुरवठा अधिकारी ह्यांचे वाढदिवसा प्रित्यर्थ राज्याचे राज्य फुल " ताम्हण ( जारूळ ) व आपट्याचे झाड आम्ही मा जिल्हा धिकारी आवारात लावले आहे.. ह्या दोन्ही झाडांचे महत्व खास आहे. ताम्हण हे राज्य फुल असल्याने ते येणाऱ्या पिढीस येता जाता पाहायला मिळाले पाहिजे. तसेच आपट्याची पाने आपण सोन म्हणून विजयादशमीला लुटतो पण ती प्रजाती ह्या मुळे ओरबडली जाते असे वाटल्याने ही दोन झाडें आम्ही निवडली..
आपण ही असा छोटा प्रयत्न करून पहा..एखाद्या ला आपण जीवन देऊ शकतो ह्या नुसत्या विचारानं ही मन सकारात्मक होऊन जात. क्यू न ये शुरुवात पौधो से ही की जाय?
#Babystep is better than none at all..#
#छोटी सुरुवात मोठं यश #
#save nature, save your existence#
लिना फलके, ढेंगे
तहसीलदार,
प्रभारी उपजिल्हाधिकारी रोहयो