Bluepad | Bluepad
Bluepad
तगमग---
saru pawar
saru pawar
23rd Jun, 2022

Share

तगमग जीवाची होते ,विचारांच काहुर माजत मनात तो टेबलावरच कागद नि पेन सारख आपल खुणावतो , सकाळी लवकर उठल तरी त्याची नी माझी भेट नाहिच होत हे करू नि मग लिहु ,ते करु नि मग लिहु करत करत दुपारपण सरते माझ्या या वेडाची किंमत इतरां साठी शुन्य असते काय डोंबलाच लिहायचय? काय मिळत त्याने ?? गरजेच असत तर कळत पण हा निव्वळ टाईम पास !! हे ऐकुन काळीज अजुनच जळत कस बर व्यक्त होऊ ??? संसारात इतक्या वर्षांच्या नुसता उबगलाय जीव पूरूषांच मेल बर असत , वाटल तेव्हा वाटल ते बिना रोकटोक करता येत त्यांनी मेलं केव्हांही ऊठाव नि तंगड्या पसरून पलंगावर रेलाव त्याचं शिळ्या बातम्या ऐकणही महत्वाचच आणि टेस्ट मँच असो कि वन डे ,ते बघण हि महत्वाचच मित्रां सोबत चहा काय पावसाळ्यातली भजी नी वडा -पाव कधि म्हणे श्रम परिहाराची विकेंन्ड पार्टि कधि बिजनेस मिटिंग तर कधि सोशल व्हायला त्यांच असत वेगळच सेटिंग पण ----पण स्त्रीनच जरा काय जास्त पाप केली तिला तिच नाही काहिच का वाटाव स्पेशल ऊठ बाई नि मर बाई कष्ट तुच कर बाई जरा म्हणुन मान वर करू नको आजुबाजुचे काय वागतात ते अजिबात बघु नको इतरांच्या चुकांवर तु बोट तर मुळिच दाखऊ नको जगायच असेल तर असच जग खुंटीला गोठ्यात बांधलेल्या गाई सारख तु गरजेची तोवर तुला मिळल चारा पाणी डंगरया गाईला कोण पोसत हेच बघ तुझा जन्मच ,"बाईचा" हे तु आत्ता पुर्ण स्विकार कर तुझ जगण इतरां साठीच तेच मनाशी आत्ता ठरवुन बघ कसल स्वातंत्र्य नि कसला स्वाभीमान हे शब्द तु आता विसरून बघ जगशिल बाई मग रोबोटसारखी,न भावना न दु:ख तु तर आहेस बिना खर्चाची मशिन.....

186 

Share


saru pawar
Written by
saru pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad