"आमच्या काळात" हे शब्द मला खूप आवडतात कारण प्रत्येकवेळी हे शब्द अनेक गोष्टी वेगवेगळ्या पध्दतीने सांगत असतात आणि आपल्या पुढची पिढी किती सुखी आहे ते सांगतात. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि डोळ्यातून हळूच गालावर येणारे हसू त्या गोड आठवणी आणि कटू परिस्थितीबद्दल सांगून जातात.