Bluepad | Bluepad
Bluepad
चहा ! एक प्रयोग वाटचालीचा.
स्वप्निल सुरेश वाळंज
स्वप्निल सुरेश वाळंज
23rd Jun, 2022

Share

चहा ! एक प्रयोग वाटचालीचा.
साधारणपणे आपण सर्व चहा, कॉफी, दुध हे सर्व पिण्याचे पदार्थ सर्व ठिकाणी पितो. त्यातच काही जण ज्यांना हे आवडत नाही ते थंडा जास्त पितात. पण खरं सांगतो या सर्वात चहा सारखे पेय कोणतेच नाही, कारण ऑफिस मध्ये एखादे काम करताना किंवा इतर वेळी देखील जेव्हा झोप येते तेव्हा चहा प्यायल्याने अंगात एक वेगळीच शक्ती निर्माण होते. आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते. काही जण तर रात्री जागून एखादे काम करायचे असते तेव्हा रात्रीमध्ये खूप वेळा चहा पितात.
मी कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट आहे, जेव्हा मी एका अशा ग्रुप मध्ये सामील झालो होतो, की तो ग्रुप सांस्कृतिक कामांसाठी प्रसिद्ध होता. त्या ग्रुप चा मुख्य आमचा विक्रांत दादा होता.आम्ही कोणत्या ना कोणत्या सांस्कृतिक कामासाठी कॉलेज च्या कँटीन मध्ये दिवसभर बसलेलो असायचो. आणि यावेळी आमच्या प्रत्येकाचे नाही बोलले तरी 6 ते 7 वेळा चहा व्हायचा. त्यात विक्रांत दादाचा तर 10 ते 12 वेळा असायचा. कारण तो चहा पित असताना आम्हाला काही तरी नवीन ऍक्टिव्हिटी सुचायची. आणि मग आम्ही ती अंमलात आणायचो.
चहा ! एक प्रयोग वाटचालीचा.
तसेच आता सुद्धा मी कामावर असताना दिवसातून दोन वेळा चहा हा होतोच.नाही तर कोणतेही काम करताना ऊर्जा मिळत नाही. आणि काम करताना झोप देखील येते. जेव्हा शाळेत होतो तेव्हा देखील सकाळी अभ्यास करायला लवकर उठायचो. पण तरीही खूप झोप यायची. पण जेव्हा पासून चहाची सवय लावली तेव्हा पासून अभ्यासात व्यत्यय येणे कमी झाले. एकूण कोणतेही काम करताना चहा हा हवाच. आणि म्हणूनच आपण पहातो की हल्ली बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचा चहा विक्रीसाठी येऊ लागला.जसे की केटली चहा, सेंद्रिय गुळाचा चहा, मामाभाचे चहा, स्वादिष्ट चहा, आपला चहा, अमृततुल्य चहा आणि अलीकडेच प्रेमाचा चहा अशा अनेक नावांनी चहाची विक्री चालू झाली.
आपण जेव्हा लांबचा प्रवास रात्री करतो तेव्हा वाहन चालकाला सुद्धा जास्तीत जास्त चहा घ्यावा लागतो.तेव्हाच त्याचे झोपेवर नियंत्रण होते व वाहन चालवताना व्यवस्थित राहता येते.
परंतु मित्रांनो चहा जितका चांगला तितकाच वाईट असे आजकाल बोलले जाते. कारण या चहामुळे ऍसिडिटी मोठ्या प्रमाणात होते. तसेच काही आजार देखील होतात. त्यामुळे चहा प्या परंतु आपले शरीर सुदृढ ठेवून त्या चहाचा आस्वाद घेता. चहा मुळे आपल्या शरीराचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या. चहा म्हणजे आपले जीवनाचे हे विसरून जा.

247 

Share


स्वप्निल सुरेश वाळंज
Written by
स्वप्निल सुरेश वाळंज

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad