Bluepad | Bluepad
Bluepad
रानमेवा
नैनेश म्हात्रे
नैनेश म्हात्रे
23rd Jun, 2022

Share

रानमेवा
परिक्षा झाल्या की खुप मोठ्ठी सुट्टी चालु व्हायची ती म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी...... आणि सुट्टीत मौज मजा मस्ती नुसती धमाल💃.. काजुंना (काजु खायला-तोडायला,आणायला) जायचो आख्ख्या बोरघर गावाचं हक्काच फुकटचे काजु मिळण्याचे एकमेव स्थान म्हणजे *बुरबी*(गावाबाहेरील माळ-डोंगर त्या जागेचं नाव) बुरबीत चाललोय म्हटल्यावर आपसुकच सर्वांना कल्पना यायची काजुंना चाललाय....आम्ही मिठ मसाल्याची पुडी सोबत न्यायचो कागदात बांधुन😋..... बुरबीत पोहचल्यावर लांबुन जर लालभडक मोठा काजु ज्याला पहिला दिसला तो त्याचा...मग त्याने जाऊन तो झाडावर चढुन तोडावा...त्याला आम्ही *बम* म्हणत (काजुला).... आम्ही फळाला काजु आणि बि ला काजुची बी म्हणत...... खुप वेळ आम्ही बुरबित रमत..... मग सोबतीला करवंद,आटोरणं,टोरणं,बकाळीची फळं......हा अप्रतिम चवीचा *रानमेवा* ही मिळायचा😋
काजुंसाठी पेरीचं कुरण... गोपचार (उमटे धरणाकडे).....बापल्याचा कास ही काही खास ठिकाणं होती..आहेत तेथेही आम्ही जायचो..पण *बुरबी* ही आमच्यासाठी खास होती....
खुप मोठा मित्रांचा लवा जमा घेऊन आम्ही रानमेवा चाखायला जायचो..... गावातुन निघाल्यावर वाड्याच्या माळ्यावरून जायचो... ठरवुन पाणि पिण्यासाठी एका विहीरीवर थांबायचो त्या विहीरीचे नाव " *वाकट्याची विहीर"* जेव्हा गावात नळ नव्हते तेव्हा संपूर्ण गाव त्या विहीरीचे पाणी प्यायचा गावात न्यायचा.... डोक्यावर एवढ्या लांब.....
रानात जाताना कधी आम्ही ती प्लास्टीक ची बाटली नेली नाही...वाकट्याच्या विहीरीवर मनसोक्त ओंजळीत पिंपाने पाणी काढून ते घटा घटा प्यायचं.... नाहितर आकांद्यावर (जिथे पाण्याची पाईप लाईन फुटली असेल) तिथे पाणी प्यायचं...
तेव्हा hayginic ... unhygienic असला काही प्रकार नव्हता आमच्या मनात...
बुरबितुन मग...असं असं.....बंगल्यावरून ( ठिकाणाचे नाव)...... शंकराजवळून ( श्री शंकर मंदीर) मग आपल्या घरी मार्गस्थ.....
घरी जाऊन यथोच्छ आईने बनविलेला भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर....आराम? छे ओ....सायंकाळ होण्याची वाट पाहायचो...मग खाडीत जाऊन ज्या काजुंच्या बिया आणलेल्या असायच्या त्यांची भट्टी लावायची....थोडा वेळ त्या बिया भाजल्या की बाहेर काढायच्या तिथेच दगडावर ठेचायच्या आतला गोळा (ज्याला आपण खास करून काजु म्हणतो).... तो Rosted fresh गोळा काजु अप्रतिम चव घेत खाडीतील शेतातच खायचे...
आता तेच भाजलेले काजु मोठ मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये भरमसाठ किमतीला विकले जातात.
असा हा सुट्टीतील नित्यक्रम
असं होतं आमचं बालपण..
खुप नशीबवान होतो आम्ही आमचं बालपण मोबाईल च्या दुनियेत हरवण्यापासुन वाचल...
खरी आठवण लिहायची होती...आब्यांची...पण काजु ची आठवण आली आणि बुरबी आठवली......
आंब्याची आठवण खुप मोठी आहे नक्की सांगतो........क्रमशः
आज्जी आणि आईच्या वेळेची आठवण😊✍🏻
नैनेश म्हात्रे (बोरघर-अलिबाग)✍🏻

231 

Share


नैनेश म्हात्रे
Written by
नैनेश म्हात्रे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad