विठ्ठला ... !!!
तू नक्की आहेस तरी कोण ??? तू ना कुठल्या वेदांत सापडतं ना कुठल्या पुराणात. तुझी भक्ती करणारे हे सगळे समाजसुधारकच वाटतात. जिथं बहुजनांना देवदर्शन करण्याचा अधिकार नव्हता तिथं तुझ्या भक्तीने सर्व बहुजन समाज संतपदाला गेला. एखाद्याला आपलं शिष्य करून घेणं एकवेळ सोपं, पण ते न करता माउलींनी सगळ्या बहुजन समाजातील लोकांना संतपदाला नेऊन ठेवलं .. मग ते "महार" जातीत जन्मलेले संत चोखामेळा किंवा संत सोयराबाई असोत वा कुंभार समाजात जन्मलेले संत गोरा कुंभार, गणिकेची मुलगी म्हणून जन्मलेली संत कान्होपात्रा असो वा शिंपी समाजातील संत नामदेव, संत सेना न्हावी असोत वा माळी समाजात जन्मलेले संत सावतामाळी, सोनार समाजात जन्मलेले संत नरहरी सोनार असोत ... अगदी १३-१४ व्या शतकापासून इतका विरोध जातीचं एवढं अवडंबर असताना, स्त्रियांना म्हणायला तर कसलेच अधिकार नसतात ,हे सगळं शक्य झालं ते केवळ आणि केवळ तुझ्या भक्तीने..तुझ्यात अशी काही ताकद होती हि जिने प्रस्थापित व्यवस्थेला हे स्वीकारायला भाग पाडलं किंबहुना प्रस्थापित व्यवस्थेला झोडून काढण्याची ताकदही तूच दिलीस.
तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव महाराज, एकनाथ महाराज अशी फार मोठी भव्य आणि दिव्या परंपरा तुझ्याच मुळे महाराष्ट्राला लाभली. तुच खरा पहिला समाजसुधारणेचा प्रणेता आहेस..विठ्ठला !!!!!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!👏👏👏👏
--श्री.सोमनाथ विष्णू राणे🖋️
(माझे पती)😊