हे तुझेचं विश्व आहे
कधी आई म्हणूनी, तर
कधी ताई म्हणूनी, कधी
प्रेयसी म्हणूनी,
कधी आयुष्याची अर्धांगीनी
ती तूच आहेस..
त्या शिवरायांच्या पाठीची ढाल बनूनी
जिजाई ची थाप तूच आहेस..
ज्योतिबाच्या ज्ञानाची ती तू सावित्री ती तूच आहेस..
तू आहेस आमच्या भिमरायांची ममतेची सावली रमाई..
तू आहेस इथल्या चिल्या पिल्याचा मायेचा तो घास..
तू आहेस चिऊ काऊच्या गोष्टीतला श्वास.
तू आहेस आकाशात झेप घेणारी कल्पना
तू नाहीस दासी, नाहीस बंधिस्त ह्या विश्वाची..
तू आहेस मुक्त छंद ह्या विश्वाची
तू जननी आहेस ह्या विश्वाची
कारण हे विश्व तुझेच आहे..
कवी : सन्मान जाधव
९७६८७८०५०५